चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांना शनिरत्न पुरस्कार जाहीर उद्या अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांना शनिरत्न पुरस्कार जाहीर उद्या अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान सोहळा

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवराचे सुपुत्र, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांना  श्री शनैश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


देवळाली प्रवराचे सुपुत्र, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांना  श्री शनैश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूर यांच्याकडून पहिला मानाचा शनिरत्न पुरस्कार -२०२३ जाहीर झाला असून उद्या शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता श्री.शनैश्वर मंदिर, श्री. बेलापूर येथे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पौडवाल यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान होणार आहे.

सामाजिक , धार्मिक, उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या कार्याची दखल घेत आजतागायत विविध सामाजिक संस्थांनी गौरविले असून नुकतेच शिर्डीत न्यूज स्टेट गोवा वृत्तवाहिनीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

दरम्यान आज बेलापूर यांच्याकडून पहिला मानाचा शनिरत्न पुरस्कार -२०२३ जाहीर झाला असून उद्या शुक्रवार दि.१९ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता श्री.शनैश्वर मंदिर, श्री. बेलापूर येथे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रीमती अनुराधा पौडवाल यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास शिवसेना नेते व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, श्री शनैश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूरचे प्रमुख विश्वस्त महंत श्री. दीपकदास कैलासदास वैष्णव, राज्य पोलीस पाटील संघटनेचे अँड.साईराम बानकर, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ जगताप आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमात उपस्थित रहावे असे आवाहन श्री शनैश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती बेलापूर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत