राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील ताहाराबाद रोड परिसरातील बिलीवर्स इस्टर्न चर्च येथे आजार, व्याधी, पाप, दारिद्य्र, सैतानी निराशा , दुःख व सर्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील ताहाराबाद रोड परिसरातील बिलीवर्स इस्टर्न चर्च येथे आजार, व्याधी, पाप, दारिद्य्र, सैतानी निराशा , दुःख व सर्व बंधनातून मुक्तीसाठी १९ मे ते २१ मे या कालावधीत महोत्सवाचे दररोज सकाळी १० ते २ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात HG मार्टिन मोर आप्रेम, रेव्ह.डेविड राज, रेव्ह.फा.विकास, DN फा.फ्रांसिस आदीच्या अधिपत्याखाली प्रार्थना होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड, सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस संसारे, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी नगरसेवक एकनाथ बनकर, आदिनाथ कराळे,आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, शिवसेनेचे शहरप्रमुख विजय गव्हाणे, आरपीआय राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, माजी नगरसेवक सचिन सरोदे, राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन प्रशांत काळे, आवाज जनतेचे संपादक पत्रकार श्रीकांत जाधव, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बर्डे,भाजपा राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम, माजी नगरसेवक नानासाहेब बर्डे,आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन फा.फ्रांसिस विधाटे, सेक्रेटरी संदीप तुजारे, महिला मंडळ अध्यक्ष सुशिला विधाटे व बिलीवर्स चर्चचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत