देवळाली प्रवरा ते चैतन्य कानिफनाथ मंदिर गुहा पायी दिंडी सोहळा उत्साहात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा ते चैतन्य कानिफनाथ मंदिर गुहा पायी दिंडी सोहळा उत्साहात

  राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ते गुहा येथील कानिफनाथ महाराज देवस्थान पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजार...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा ते गुहा येथील कानिफनाथ महाराज देवस्थान पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजारो भाविक भक्त गण या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.मोठ्या उत्साहात देवळालीकरांचे गुहा येथील नाथभक्तांनी स्वागत केले. मोठा पोलीस बंदोबस्त कानिफनाथ मंदिर परिसरात तैनात ठेवण्यात आला होता.



शुक्रवारी सकाळी देवळाली प्रवरा बाजार तळ येथून दिंडीचे प्रस्थान झाले. देवळाली प्रवरा स़ोसायटी, डिझेल पंप, छत्रपती शाहू महाराज कॉलेज, जुना गुहा रस्ता, कदम वस्ती आदी परिसरातून असंख्य भाविक या दिंडीत सहभागी झाले. ११.३० वाजता गुहा येथील चैतन्य कानिफनाथ मंदिर येथे दिंडी पोहोचल्यानंतर मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत करण्यात आले.


दिंडी मार्गात सुहासिनींनी सडा रांगोळी काढली होती.सर्व ग्रामस्थांनी दिंडीचे भव्य दिव्य स्वागत केले या दिंडी सोहळ्यात हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कानिफनाथ महाराजांची महाआरती संपन्न झाली. देवळालीकरांच्या वतीने २००० भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाआरती नंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत