राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी दत्तनगर भागातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय येथे आज शनिवार २० ते सोमवार २२...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील कराळेवाडी दत्तनगर भागातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय येथे आज शनिवार २० ते सोमवार २२ मे या कालावधीत व्यक्तिमत्त्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
आज शनिवारी ५ वाजता या शिबिरास प्रारंभ होणार असून तीन दिवसीय शिबिरात व्यक्तिमत्व विकास, नैतिक मूल्यांवर आधारित उपक्रम,एकाग्रता व स्मरणशक्ती विकास,कौशल्यपूर्ण अभ्यासाची पद्धत गोष्टीं स्वरूपात मूल्यांची धारणा,परस्पर संवाद, विकसित करणारे खेळ, आरोग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिरात ९ ते १५ वर्ष वयोगटातील मुले व मुली सहभागी होऊ शकता.हे शिबिर पूर्णपणे मोफत असून आधिक माहितीसाठी 9561381346 या क्रमांकावर संपर्क साधावा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत