चोथे परिवार शेतीशी निगडित व्यवसायात निश्चित भरारी घेतील- उद्धव महाराज मंडलिक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चोथे परिवार शेतीशी निगडित व्यवसायात निश्चित भरारी घेतील- उद्धव महाराज मंडलिक

राहुरी(वेबटीम)  आण्णासाहेब चोथे यांनी बँकिंग व राजकीय क्षेत्रात 'आदर्श' काम  केले असून  ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवले त्यात...

राहुरी(वेबटीम)



 आण्णासाहेब चोथे यांनी बँकिंग व राजकीय क्षेत्रात 'आदर्श' काम  केले असून  ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवले त्यात त्यांना यश मिळत गेल्याने शेतकऱ्यांशी निगडित पशुखाद्य व्यवसायात भरारी घेतील असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक  यांनी केले.




  चोथे वस्ती येथे सोमनाथ ट्रेडर्स या पशुखाद्य दालनाचा महंत उद्धव महाराज यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न झाला.प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ.चंद्रशेखर कदम, ज्येष्ठ नेते आसाराम ढुस, सीताराम ढुस, प्रेरणा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश वाबळे,  तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, संचालक मच्छीन्द्र तांबे, विजय डौले आदी मान्यवर उपस्थित होते.



 पुढे बोलताना उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की, चोथे परिवार सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी स्वतःला झोकून घेताना पहावयास मिळतो. अण्णासाहेब चोथे यांनी बँकिंग क्षेत्रात काम करताना अनेकांना सोबत घेऊन दृष्टी दिली. परिसरातील शेतकऱ्यांना कमी वेळेत दर्जेदार पशुखाद्य मिळावे यासाठी सुरू केलेला व्यवसाय हा निश्चित भरभराटीला जाईल असे म्हणाले.


माजी आ.चंद्रशेखर कदम म्हणाले की, चोथे कुटूंबिय शांत व संयमी असून पशुखाद्य व्यवसाय करत असताना नक्किच ग्राहकांना समाधान मिळेल असे काम त्यांच्या हातून घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी देवळाली सोसायटीचे माजी चेअरमन सोपान शेटे, बाळासाहेब खुरुद, बागायत पीक सोसायटीचे उपाध्यक्ष मच्छीन्द्र कदम,  राहुरी निधीचे चेअरमन रामभाऊ काळे, माजी उपनगराध्यक्ष कारभारी वाळुंज, वैभव गिरमे, मारुतराव हारदे, सतीश वाळूंज, आदीनाथ कराळे, योगगुरू किशोर थोरात, भिमराज मुसमाडे, डॉ.रवींद्र वामन, सचिन शिंदे, नंदु चोथे, भारत चोथे आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन ढुस यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत