राहुरी फॅक्टरीचा सलून व्यावसायिक ' आप्पा'चा शोध लागेना - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीचा सलून व्यावसायिक ' आप्पा'चा शोध लागेना

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा सावकारकी असून म्हैसगाव, तांदुळवाडी येथे खासगी सावकारकी  कारवाईची चर्चा थाबंत नाह...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदा सावकारकी असून म्हैसगाव, तांदुळवाडी येथे खासगी सावकारकी  कारवाईची चर्चा थाबंत नाही तोच राहुरी फॅक्टरीतील सलून व्यावसायिक खासगी सावकारीच्या जाचास कंटाळुन बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.बेपत्ता सलून व्यावसायिक दोन दिवस उलटून गेले तरी मिळून आला नसल्याने कुटुंब चिंताग्रस्त आहेत. सलून व्यवसायिकाला सातत्याने तगादा करणाऱ्या खासगी सावकारांची नावे उघड होणार असल्याने त्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून पोलीस यंत्रणा व सहायक निंबधक विभागाने याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.


 देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरातील खासगी सावकारकी मोठया प्रमाणात सुरु असून सावकारकीचा  व्याजदर महिन्याला ३० ते ४० टक्के याप्रमाणे आहे. खासगी सावकाराच्या जाचामुळे या परिसरातील व्यावसायिक व इतर नागरिकांनी आत्महत्या तसेच गाव सोडून जाण्याचे पाऊल उचलले आहे. देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी खासगी सावकारकी प्रश्नी मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.


 गेल्या दोन दिवसांपूर्वी फॅक्टरीतील सलून व्यवसायिक आप्पा थोरात हा राहत्या घरातून खासगी सावकारांच्या त्रासास वैतागून घर सोडून गेला आहे. दोन दिवस उलटले तरी त्याचा शोध लागत नाही. आई, भाऊ, पत्नी, लहान लहान मुले पूर्णपणे हताश झाले आहेत. याबाबत आप्पा थोरात याची पत्नीने राहुरी पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून केवळ मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.


 थोरात बेपत्ता झाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरताच  त्याला पैसे देणाऱ्या सावकारांत एकच खळबळ उडून आपली नाव उजेडात येणार असल्याने सावकार वर्गाची जमिनीखालची वाळू सरकली आहे.


छोट्या खासगी सावकारांनी आप्पा थोरात यांच्या घरातील सदस्यांकडे संपर्क करून आमचं नाव घेऊ नका, आम्हाला रुपया देऊ नका, सगळं आम्ही सोडून देतो अशी विनवणी सुरू केली आहे. दुसरीकडे थोरात कुटुंबावर बडे सावकार दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे.


     राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील सावकारकी नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येते परंतु पोलीस प्रशासनाचे त्यांच्याशी असलेल्या 'अर्थ' पूर्ण संबधामुळे कारवाई होत नाही. मात्र यामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन खासगी सावकारकीला लगाम घालावा अशी मागणी होत आहे.


    राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात खासगी सावकारकीचे मोठया प्रमाणात जाळे असून झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी विशेषतः  तरुणवर्ग याकडे आकर्षिला जात आहे. खासगी सावकारीला पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासन व सहायक निबंधक विभाग पूर्णपणे अपयशी ठरत आहे. याप्रश्नी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन वस्तुस्थिती समोर मांडून कारवाई करण्यासाठी मागणी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी 'आवाज जनतेचा' वेबपोर्टलशी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत