राहुरी(वेबटीम) येत्या १९ मे रोजी श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र गुहा कानिफनाथ देवस्थान येथे पायी दिंडी सोहळयाचे आयोजन करण्यात आल...
राहुरी(वेबटीम)
येत्या १९ मे रोजी श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ते श्रीक्षेत्र गुहा कानिफनाथ देवस्थान येथे पायी दिंडी सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार १९ मे रोजी सनई-चौघडा,घोडा,वारकरी टाळकरी यांच्या उपस्थित हरिनामाच्या जय घोषात भव्य अशी पायी दिंडी देवळाली बाजारतळ येथून सकाळी ९ वाजता निघणार आहे.
गुहा येथे कानिफनाथ महाराज यांची महाआरती होऊन महाप्रसादाचे आयोजन केले असून श्रीक्षेत्र देवळाली प्रवरा ग्रामस्थांची गुहा येथे पंगत होणार आहे.
तरी देवळाली प्रवरा शहरातील प्रत्येक घरातील पुरुष महिला व आबालवृद्धांनी या दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत