राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील श्री.त्र्यंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेच्यावतीने गुरुवार दि १८ मे ते शनिवार दि.२७ मे या कालावधी...
राहुरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील श्री.त्र्यंबकराज स्वामी शैक्षणिक व वारकरी संस्थेच्यावतीने गुरुवार दि १८ मे ते शनिवार दि.२७ मे या कालावधीत वारकरी बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्री. ब्रम्हलीन बबन महाराज पायमोडे यांच्या कृपा आशिर्वादाने व महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक भवन, नगरपरिषद कार्यालया समोर येथे विनामूल्य सदर शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
*नियम व वैशिष्टयेः*
• वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
•वय वर्षे १० ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश
• सर्व मुलांना पांढरा गणवेश बंधनकारक.
● पालकांनी मुलांना जाण्यायेण्याची व्यवस्था करावी.
• दुपारचे भोजन व सायंकाळी चहा व्यवस्था आयोजकांकडे राहिल
● शिबीर काळात भजन, संस्कृत श्लोक, संस्कार प्रवचन शिकविण्यासाठी मान्यवर महाराज, शिक्षकांची उपस्थिती
● शिबीरामध्ये दररोज प्राणायाम, योगासने, प्रार्थना, आरती, गीतापाठ, स्तोत्रपठण, मुलांशी वार्तालाभ खेळ, भारतीय संस्कृतीचे महत्व, विविध सण, उत्सव, वार, महिने, नक्षत्रविषयी माहिती
*शिबीरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे महाराज व शिक्षकवृंद*
ह.भ.प. दुर्गाप्रसाद महाराज तिडके, ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री, ह.भ.प. बाबा महाराज मोरे, ह.भ.प. सुभाष महाराज विधाटे, ह.भ.प. रविंद्र महाराज पायमोडे, ह.भ.प. आबा महाराज कोळसे, ह. भ. प. सोमनाथ महाराज माने, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज खांदे
*नावनोंदणीसाठी संपर्क*
नामदेव महाराज शास्त्री,मो-८७८८४७४५९८
ह.भ.प. बाबा महाराज मोरे,मो-८३२९८५६४४१
ह.भ.प. सुभाष महाराज विधाटे मो.७६६६२९२२६२

कोणत्याही टिप्पण्या नाहीत