राहुरी(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदेने रेड्युस ,रियूज, रिसायकल अर्थात कचरा कमी...
राहुरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेने रेड्युस ,रियूज, रिसायकल अर्थात कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर व त्यावर प्रक्रिया करून नव्याने उपयोगात आणणे याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभरातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपरिषद 'माझे स्वच्छ शहर' अभियान राबवणार आहे. पाच जूनपर्यंत चालणाऱ्या या तीन आठवड्यांच्या या अभियानांतर्गत शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, बूट, बॅग, फर्निचर, भांडी व अन्य साहित्याचे संकलन केले जाईल. या संकलीत कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करून किंवा नूतनीकरण करून पुनर्वापर करण्यात येईल. शहरातील स्वयंसेवी संस्था, बचतगटांच्या महिला सदस्य व नागरिक गटांना या अभियानात सहभागी होता येईल.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.अजित निकत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.२०/०५/२०२३ रोजी ठीक "त्रिंबकराज सार्वजनिक वाचनालय " येथे "RRR सेंटर"चे उद्घाटन शहरातील जेष्ठ नागरिक श्री.लक्ष्मण मोरे यांचा हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी देवळाली प्रवरा नगरपरिषदे चे आरोग्य विभागाचे अभियंता श्री.अमोल दातीर,ग्रंथपाल श्री.संभाजी वाळके,श्री.राजेंद्र हरगुडे,श्री.गोरख भांगरे , शहर समन्वयक श्री.उदय इंगळे,इतर नगरपरिषद कर्मचारी व नागरिक उपस्थित होते तसेच मुख्याधिकारीअजित निकत यांनी प्रसंगी नागरिकांनी आपल्या कडील जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, बूट, बॅग, फर्निचर, भांडी व अन्य साहित्य RRR सेंटर वर देण्यात यावे असे आवाहन केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत