राहुरी(वेबटीम) राहुरी येथील महात्मा कृषी विद्यापीठ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री यांच्या उपस्थितीत २५ मे रोजी ५१ वी...
राहुरी(वेबटीम)
राहुरी येथील महात्मा कृषी विद्यापीठ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री यांच्या उपस्थितीत २५ मे रोजी ५१ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक होत असून या कार्यक्रमावर उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बहिष्कार टाकल्याने एकच चर्चेला उधाण आले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कृषी विद्यापीठे ५१ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक २०२३ आणि कृषी समितीची बैठक उद्घाटन समारंभ २५ मे रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे,कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रम पत्रिकेत जिल्ह्यातील खा.सुजय विखे, आ.राम शिंदे, आ. सत्यजित तांबे, आ.प्राजक्त तनपुरे यांचे नावे आहेत. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांचे नाव पत्रिकेत नसल्याने शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवून आपणही हा कार्यक्रम टाळावा अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, कमलाकर कोते, अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव, उपजिल्हाप्रमुख अण्णा म्हसे,जयवंतराव पवार, राहुरी तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, सुनील कराळे आदिंच्या सह्या आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत