राहुरी/वेबटीम:- राहुरी खुर्द येथील रहीम करीम शेख या तरुणाने राहुरी पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने १७ मे रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ...
राहुरी/वेबटीम:-
मी राहुरी खुर्द येथील रहिवाशी असून माझ्या मालकीची इनोव्हा गाडी दोन वर्षापूर्वी पवन गिराशे नामक व्यक्तीस इसार रक्कम घेऊन गाडी दिलेली होती. उर्वरित रक्कम तगादा करून ही मिळालेली नाही. गाडी ही कोठेही आढळून येत नाही सखोल माहिती घेतली असता सदर गाडी मधून आंमली पदार्थ व गुटखा वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली. सदर इसमावर राहुरी पोलिस स्टेशन येथे गुटखा विक्री संदर्भात पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार तीन महिन्यापूर्वी माननीय पोलिस निरीक्षक राहुरी यांच्या बरोबर चर्चा झाली होती गाडी परत मिळून देण्या बाबत त्यानी अश्वासन दिले होते. परंतु कोणतेही कार्यवाही न झाल्यामुळे एक महिन्यापुर्वी मा. पोलिस निरीक्षक राहुरी यांना लेखी तक्रार देऊन फिर्यादी दाखल करून घेऊन गाडी पोलीसा करवी गाडी पोलिस स्टेशनला जमा करावी ही विनंती केली. परंतु कोणत्याही प्रकारचे कार्यवाही होत नाही या बाबात मा. जिल्हा पोलिस प्रमुख, विभागीय पोलीस प्रमुख यांना तक्रार अर्ज देऊन विनंती केली तरीही न्याय मिळण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही. याबाबत विचारणा केली असता दिवाणी दावा दाखल करण्याचा सल्ला देण्यात आली तरी या अनुषंगाने खुलासा करतो की, आर्थिक देवाणघेवाण संदर्भात दिवाणी दावा दाखल करण्याचे मी मान्य करित आहे. परंतु सदर गाडीतून समोरील व्यक्ती आमली पदार्थचे वाहतुक करीत असून महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने पराज्यातून तो गुटाखा वाहतुक रात्रीच्या वेळेत तो करत आहे. त्यानुसार राहुरी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहे. सदर इसमाची पोलिस विभागाशी हीत संबंध असल्याने त्याच्यावर कोणतेही कार्यवाही केली जात नाही व मला न्याय मिळत नाही व गुन्हेगारास संरक्षण देण्यात येत आहे.
सदर इसम हा गुंड प्रवृत्तीचा असून दादागिरी करणे. पिस्तुलाचा धाक दाखवणे पोलीस स्टेशनला गेल्यास जीवे मारण्याचा धमकी देणे आशा प्रकारे दडपशाही करीत असून या प्रकारामुळे माझ्या जीवतास धोका निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टी पोलीसांना माहिती असून ही ते त्याच्यावर कोणतेही कार्यवाही करत नाही. तरी पोलीस निरीक्षक हे याबाबदची कोणतीही दखल घेत नसून सदर प्रकरणाबाबद ते मलाच दोषी धरून प्रकरण बाहेर मिटवण्याचा सल्ला देत आहे आम्ही सर्व सामान्या भारताचे नागरिक असून गुंड लोका बरोबर भांडणा करण्याची आमची क्षमता नाही पोलीस निरीक्षक राहुरी यांना गुन्हेगारी रूपाचे व्यक्ती बाबद पुर्ण कल्पना असूनही सर्वसामान्याना न्याय देणे बाबद दाखल घेत नाही या प्रकारातुन काही गंभीर प्रकार उद्भवल्यास आमचे जीवन उद्धवस्त होणेचा धोका निर्माण झाला आहे. तरी यासर्व बाबीचा विचार केल्यास पोलीस निरीक्षक राहुरी हे सर्व सामान्याना न्याय देणेचे मुळ उद्बोशालाच बगल देत असून कर्तव्यात कसुड करत आहे. तरी पोलीस निरीक्षक राहुरी यांची चौकशी करून मला न्याय मिळावे ही विनंती.
सदर बाब ही गंभीर स्वरूपाची असून आमच्या कुटुंबाला मानसिक त्रास होत आहे. सदर निवेदन द्वारे मी विनंती करतो की, सदर निवेदनाची १५ दिवसाचा आत दखल घेऊन माझी इनोव्हा गाडी राहुरी पोलीस स्टेशनला जमा करून समोरील व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करावी. जर १५ दिवसात काही कार्यवाही न झाल्यास बुधवार दि. १७/५/२०२३ रोजी मुख्यमंत्र्याचे निवासस्थानी आगमनापर्यंत कालवधीत केव्हाही सर्व कुटुंबासह आत्मदहन करणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत