संस्कृती फाउंडेशन स्कूलची यशस्वी निकालाची परंपरा यंदाही कायम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संस्कृती फाउंडेशन स्कूलची यशस्वी निकालाची परंपरा यंदाही कायम

राहुरी(वेबटीम) मदर्स एज्युकेशन सोसायटी संचलित, संस्कृती फाउंडेशन स्कूल,राहुरी या सी.बी.एस.इ. मान्यता प्राप्त स्कूल चा इ १० चा बोर्ड परीक्षेच...

राहुरी(वेबटीम)



मदर्स एज्युकेशन सोसायटी संचलित, संस्कृती फाउंडेशन स्कूल,राहुरी या सी.बी.एस.इ. मान्यता प्राप्त स्कूल चा इ १० चा बोर्ड परीक्षेचा निकाल  परंपरेनुसार यावर्षी ही नगर जिल्ह्यात सर्वोत्कष्ट लागला असु या स्कूल चा विद्यार्थी  रोनित किशोर सोनवणे याने ९८.२०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला , हर्ष लोकेश गुगळे याने ९७.६०% गुण मिळवून द्वितीय तर कु. दुर्वा किशोर वडितके  हिने ९७.२०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला तसेच समृध्दी मुकुंद मैड हिने ९६.४०% गुण मिळवून चौथा क्रमांक व अदिती लक्ष्मीकांत कोरडे हिने ९४.६०% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला. 



साक्षी बाबासाहेब वालझडे हिने ९३.८०% गुण मिळविले, अन्वय रविकिरण वने व वैभव राधाकिसन शेटे या विद्यार्थ्यानी ९३.४०% गुण मिळविले, सुमेध प्रताप गिरगुने या विद्यार्थ्याने ९१.४०% गुण मिळविले जाय नितेश पटेल या विद्यार्थ्याने ९१%  व सुराणा भूमी धनेश हिने 90% गुण मिळविले तसेच १२ विद्यार्थ्यानी ८०% पेक्षा जास्त गुण मिळविले. इंग्रजी विषयात ९ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण, हिंदी विषयात १७ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण, गणित विषयात १० विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण तसेच हर्ष गुगळे याने १००%  मिळविले, विज्ञान विषयात ८ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण, समाजशास्त्र विषयात ११ विद्यार्थ्याना ९०% पेक्षा जास्त गुण व रोनीत सोनवणे याने १०० % गुण मिळविले तसेच माहिती तंत्रज्ञान विषयात १६ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण तसेच हर्ष गुगळे व  रोनित सोनवणे यांनी १००% गुण मिळविले.सर्व गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश तनपुरे सर, सेक्रेटरी श्री अभिजित तनपुरे सर, प्राचार्य श्री औदुंबर कडू सर, मनोज तांबे सर ,श्री संग्राम गोरे सर, श्री संदिप जरे सर , सौ.रूपाली मुसमाडे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .


त्यांच्या  यशाबद्दल संस्थेचे संस्थापक  अध्यक्ष श्री सुरेश तनपुरे सर, सेक्रेटरी श्री अभिजित तनपुरे सर, प्राचार्य श्री औदुंबर कडू सर, मनोज तांबे सर, श्री संग्राम गोरे सर, श्री संदिप जरे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले व पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत