राहुरी शहरात भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट शाखेचा भव्य उदघाटन सोहळा संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरात भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट शाखेचा भव्य उदघाटन सोहळा संपन्न

  राहुरी(वेबटीम) भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर या संस्थेचा राहुरी शाखेचा  भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या ह...

 राहुरी(वेबटीम)



भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर या संस्थेचा राहुरी शाखेचा  भव्य उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.


अहमदनगर येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या संस्थेने अल्पावधीतच आपला नावलौकिक करत नऊ महिन्याच्या कार्यकाळात १४ वी शाखा राहुरी येथील नगर मनमाड रोड, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एचडीएफसी बँकेच्या वरच्या मजल्यावर सुरू केली आहे.


या शाखेचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भामाठाणचे अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती  सद्गुरु स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले.


यावेळी चैतन्य उद्योग समूहाचे गणेश दादा भांड भाजपाचे ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस नारायण धोंगडे तसेच  ,तहसीलदार चंद्रजीत राजपूत, सी.एम.डी.  साई सोलुशन कन्सल्टिंग सर्विसेसचे अशोक पागिरे,अमृत विश्वासराव उदावंत एचडीएफसी बँकेचे मॅनेजर शंकर सोनवणे,  मान्यवर उपस्थित होते.


महंत अरुणगिरीजी महाराज म्हणाले की, भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे चेअरमन भारत पुंड यांनी समाजाच्या कल्याणाकरता लोकांच्या अडीअडचणी करता  ही सुविधा राहुरीकरांसाठी सुरू केलेली आहे.संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी दूर होतील समाज उपयोगी सेवा घडेल.


 चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड म्हणाले की, भाग्यलक्ष्मी  संस्थेच्या माध्यमातून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना निश्चित हातभार लागणार आहे.


भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन भारत पुंड यांनी सांगितले की, आमच्या संस्थेत वार्षिक ठेवीवर 12 टक्के व्याजदर मिळेल तसेच सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.


 यावेळी विश्वधन अर्बन निधीचे चेअरमन अशोक मरकड  विश्वमनी निधीचे चेअरमन गणेश गोपाळ, एचडीएफसी बँके नाशिक मॅनेजर दिनेश कुंदनवाल, मेडिस्टार हॉस्पिटल नगरचे संचालक अमोल नवले, महेश ढोकने (उंबरे),मंगेश भवार(कारेगाव),शुभम वाघ (कारेगाव)

सचिन बडाख(मालुंजे), भाग्यलक्ष्मी राहुरी शाखेचे मॅनेजर ऋषिकेश बंग, रेहान शेख, सचिन विधाते, सुरज कुसळकर, अरुण खंडागळे,वैभव भालेकर,विशाल जावळे,प्रथमेश बिबवे,अनिकेत कोल्हे,संदीप आदिक, सागर शिरसाठ,अक्षय जाधव,नवनाथ कापरे, रेणुका आढाव आदी उपस्थित होते.


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत