पानेगांव (वार्ताहर) नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची २९८वी जयंती मोठ्या उत्साहात ...
पानेगांव (वार्ताहर)
नेवासे तालुक्यातील पानेगांव येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची २९८वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पानेगांवचे मा.लोकनियुक्त सरपंच संजय पाटील जंगले यांनी अहिल्याबाई होळकरांच कार्य सर्वच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं.
अध्यक्षस्थानी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील घोलप हे होते.
जंगले यावेळी बोलतांना सांगितले की, देशभरात मंदिर जिर्णोध्दार कार्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हाती घेतले. आपण भाग्यवान आहोत की चौंडी गांव हे आपल्या जिल्ह्यात आहे. अहिल्याबाईंचं जन्मस्थळ आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य भरात अहिल्याबाई होळकरांचा जयंती निमित्ताने ज्या कर्तबगार महिलांसाठी पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला नक्कीच अभिमानास्पद असल्याचं सांगून पानेगांव येथील दोन महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यामध्ये सौ.समाबाई कारभारी जंगले यांच धार्मिक काम त्याच बरोबर आरोग्य शिक्षणा बाबत जनजागृती दुसऱ्या पुरस्काराचा मानकरी सौ.सुरेखा जनार्दन जंगले यांच बचत गटांमध्ये उल्लेखनीय काम असून बचतगट चळवळीमुळे महिला सक्षमीकरण मधून महिलांना मोठे योगदान लाभले आहे. या निमित्ताने भविष्यात हि कै.पोपटराव पाटील संस्थेच्या वतीने चांगलं काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे जंगले यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी मा.उपसरपंच रामराजे जंगले, ग्रामपंचायत सदस्य सतिश जंगले पोपटराव पाटील संस्थेचे संचालक रमेश गुडधे, पोपटराव वाघमारे, राजेंद्र शेंडगे,सिताबाई गागरे,नंदाबाई जंगले,उषाबाई जंगले,आशा सेविका, उपस्थित होत्या.
प्रस्ताविक ग्रामविकास अधिकारी संभाजी दौंड यांनी केले.सुत्रसंचालन- पत्रकार बाळासाहेब नवगिरे आभार - सुनिल चिंधे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत