आरपीआयच्या नगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी श्रीकांत भालेराव यांची फेरनिवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरपीआयच्या नगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी श्रीकांत भालेराव यांची फेरनिवड

राहुरी(प्रतिनिधी) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मुंबई येथील राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्य...

राहुरी(प्रतिनिधी)





रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मुंबई येथील राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्यकारीणीची बैठक पार पडली. या बैठकीत अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी श्रीकांत भालेराव यांची फेरनिवड करण्यात आली आहे.


 आगामी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरवर बैठक संपन्न झाली.या बैठकीत ना.आठवले यांनी राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

 प्रसंगी श्रीकांत भालेराव यांची नगर जिल्हा संपर्कप्रमुख पदी फेरनिवड केली तर सुगाव(अकोले) येथील राज्य सचिव विजय वाकचौरे यांना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख तर आश्वी येथील रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड यांना जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. भुसावळ येथील रमेश मकासरे यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या बैठकीस आरपीआयचे राज्याध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, परशुराम मोरे, सूर्यकांत वाघमारे, शहाजी कांबळे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत