राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्चच्यावतीने आयोजित इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्चच्यावतीने आयोजित इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी फातिमा माता चर्च येथे राहुरी फॅक्टरी,देवळाली प्रवरा,लाख,कनगर,वडनेर, ताहराबाद आदी गावांतून इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा फातिमा माता चर्च कमिटीच्या वतीने सन्मानपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश राऊत म्हणले की,विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण घेण्यासाठी चांगल्या प्रकारे सुयश मिळवावं व उच्च पदावर जाऊन समाजाची सेवा करावी यासाठी त्यांचा छोटासा सन्मान करून प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला गेला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी फातिमा माता चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश राऊत,येशू मारिया सदनच्या सिस्टर सूपिरिअर सिस्टर तारा ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली संजय संसारे,वसंत सांगळे,भिकाजी ओहोळ गुरुजी,केदारी सर,सुरेश बागुल,प्रताप पाळंदे,प्रवीण पाळंदे,शरद साळवे,प्रमोद काळपुंड,पप्पू बोर्डे,विकास चक्रनारायन,नेल्सन कदम आदिंसह फातिमा माता चर्च कमिटीचे सदस्य प्रयत्नशील होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार आशिष संसारे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत