कणगर(वेबटीम) कणगर येथील न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व नवीन प्रवेश केलेल्या ...
कणगर(वेबटीम)
कणगर येथील न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार व नवीन प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत , गणवेश वाटप, पुस्तके वाटप संपन्न झाला.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय गाढे यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत सरपंच सर्जेराव घाडगे, जिल्हा परिषद सदस्या नंदाताई गाढे, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी शाळेत जाऊन स्वागत केले.
न्यू प्रसाद माध्यमिक विद्यालय विद्यार्थी अजय घाडगे याची मुंबई पोलिस दलात निवड झाली म्हणून व इयत्ता दहावी परीक्षा प्रथम ३ क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी कु. संजीवनी सिनारे, कू निकिता धामोरे, कु. मंगल बलमे तसेच एम एन एन एस परीक्षेत पास झालेले विद्यार्थी रेहान शेख, सुप्रिया धामोरे, आपूर्वा घाडगे, ओंकार गाढे तसेच मुख्याध्यापक पेरणे सर व शिक्षक बंधू भगिनींचा कृतज्ञतापूर्वक शाल श्रीफळ व पेन देऊन सन्मान केला .
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पेरणे सर यांनी ग्रामस्थ व पालकांच्या सहकार्याने शाळेत राबविणे त येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.श्री सर्जेराव घाडगे यांनी शाळेत येणारे विद्यार्थी हे शिक्षकांनी आज चांगले घडविले तर सशक्त भारत निर्माण होईल असे सांगून चांगल काम करणाऱ्यांच्या पाठीशी कनगरचे पदाधिकारी व पालक नेहमी उभे राहत असल्याचे सांगितले.
यावेळी केंद्रप्रमुख भागवत मॅडम,उपसरपंच महमद भाई इनामदार, भास्करराव गाढे, संदीप घाडगे, मच्छिंद्र वरघुडे, पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे, आण्णासाहेब घाडगे, रंगनाथ घाडगे, आण्णासाहेब गाढे, संपत नालकर, जयसिंग घाडगे , गोविंदराव दिवे, वसंतराव घाडगे, सुभाष नालकर , दादासाहेब घाडगे, कोळसे सर मेहेत्रे सर, ई सह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते खाडे सर यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत