राहुरी फॅक्टरीचे वृक्षमित्र प्रितेश तनपुरे यांची देवळाली प्रवरा नगरपालिकेकडून पर्यावरण दूत म्हणून निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीचे वृक्षमित्र प्रितेश तनपुरे यांची देवळाली प्रवरा नगरपालिकेकडून पर्यावरण दूत म्हणून निवड

देवळाली प्रवरा(वेबटीम) वृक्षवाटप, वृक्षरोपण व वृक्षसंगोपनाचे कार्य करण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले राहुरी फॅक्टरी येथील प्रितेश दिलीपराव तनप...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



वृक्षवाटप, वृक्षरोपण व वृक्षसंगोपनाचे कार्य करण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेले राहुरी फॅक्टरी येथील प्रितेश दिलीपराव तनपुरे यांची माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे.


या निवडीचे पत्र मुख्याधिकारी अजित निकत यांच्या हस्ते तनपुरे यांना प्रदान करण्यात आले आहे. यावेळी जगदीश शिंदे उपस्थित होते.


या पत्रात म्हंटले की, महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान ४.० च्या धर्तीवर आपली देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडून "पर्यावरण दूत" म्हणून निवड करण्यात आली आहे.तरी त्याला अनुसरून आपण पर्यावरणाचे भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश या पंच महाभूतांच्या संवर्धन व संरक्षणासाठी वृक्षारोपण , प्लास्टिक बंदी, जलसंवर्धन, अक्षय उर्जेचा (सौर, पवन, बायोगॅस उर्जा इ.) वापर, इंधन विरहित वाहनांचा (सायकल, विद्युत वाहन) वापर, माझी वसुंधरा अभियानाची माहिती इ. विषयांची देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती आपल्या कामाचा माध्यमातून करावी व अभियानात आपला सहभाग नोंदवावा.


या निवडीबद्दल प्रितेश तनपुरे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत