राहुरी फॅक्टरी येथील मेघना क्लासेसचा विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील मेघना क्लासेसचा विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

  राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथे डॉ. तनपुरे कामगार गेल्या १० वर्षापासून मेघना क्लासेस सुरू आहे. यावर्षी मेघना क्लासेसचा दहावीचा निकाल १०...

 राहुरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथे डॉ. तनपुरे कामगार गेल्या १० वर्षापासून मेघना क्लासेस सुरू आहे. यावर्षी मेघना क्लासेसचा दहावीचा निकाल १००% लागला असून या मेघना क्लासेसची विद्यार्थीनी कु. स्वराज अशोक वरकड हिने ९८.८० टक्के गुण मिळवून राहुरी तालुक्यासह डीपॉक स्कूलमध्ये प्रथम  येण्याचा मान मिळविला आहे. व श्री छत्रपती हायस्कूलची विद्यार्थीनी कु.अनुष्का वेदपाठक हिने ८९ टक्के गुण मिळवून विद्यालयात द्वितीय आली आहे.


यापूर्वीचे मेघना क्लासेस मधून रोहन शेटे, गणेश गागरे यांनी घवघवीत यश संपादन करून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला. तसेच यश थोरात याने सीबीएसी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला.


 मेघना क्लासेसच्या प्रमुख मेघना गांडुळे यांचे क्लासमधून यापूर्वी नवोदय, प्रज्ञाशोध, स्कॉलरशीप यासारख्या परीक्षेतही घवघवीत यश संपादन करून क्लासची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. माजी विद्याथी ऋषीकेश पवार व अर्थव पवार यांनी डॉक्टर पदवी संपादन करून क्लासची महती वाढविली आहे.



यंदा इ. १० वीमध्ये कु.स्वप्नाली वरकड, कु. अनुष्का वेदपाठक, चि. अक्षय पटारे, संस्कार राऊत, कुणाल राका, मयूर गागरे अभय राजदेव, अभिषेक गागरे आदी विद्यार्थ्यांनी भरघोस गुण मिळवत यश संपादन केले आहे.


इयत्ता १० वी मधील विविध शाळेतील विद्यार्थी १ ते ३ श्रेणीत उतीर्ण झालेले आहेत. अनेक विद्यार्थी व पालकांनी मेघना गांडूळे  यांचे आभार व्यक्त केले आहे.


...म्हणून मनोमनी दुःख वाटत...

डिपॉल शाळेच्या उपप्राचार्य स्व. जॉय मॅडम यांनी मेघना गांडूळे यांच्याकडे  तुझ्या क्लासचा डी पॉल  स्कूळचा विद्यार्थी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून डी पॉल स्कूलचे नाव उज्वल करेल असज अपेक्षा व खात्री व्यक्ती केली होती. आज डिपॉल स्कुलची स्वराली वरकड हिने ९८.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला मात्र हे पाहण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी साठी स्व. जॉय मॅडम नाहीत याचे मनोमन दुःख वाटत असल्याचे मेघना गांडूळे यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत