राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील रहिवासी व डिपॉल इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थीनी स्वराली अशोक वर...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील रहिवासी व डिपॉल इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थीनी स्वराली अशोक वरकड इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९८.८० टक्के गुण मिळवून राहुरी तालुक्यात प्रथम व डिपॉल स्कुल मध्येही प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
तनपुरे कारखाना कामगार वसाहतीत राहणारी स्वराली वरकड ही तनपुरे कारखाना कॉलनी परिसरात परीक्षा कालावधीत वीजपुरवठा खंडित असताना प्रचंड जिद्द व चिकाटीने अभ्यास करत दहावीच्या परीक्षेला सामोरे गेली.
आज निकाल जाहीर झाला असता तिला ९८.८० टक्के गुण मिळविले आहे. स्वराली हिने तालुक्यात व डिपॉल स्कुलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. आतापर्यंतच रेकोर्ड मोडीत काढून सर्वाधिक गुण तिने मिळवले आहे.
तिच्या यशाबद्दल डिपॉल स्कुलचे प्राचार्य, उपप्राचार्य व शिक्षक वृंद तसेच वरकड कुटुंबीय व नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत