राहुरी फॅक्टरी(वेबटीम) शेतकरी कुटुंबातील तरुणांनी व्यवसायात पुढे येऊन प्रगती साधणे आवश्यक आहे. सुमित कदम हे एम.एच १७ केक व्यवसायात स्वतःला...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
शेतकरी कुटुंबातील तरुणांनी व्यवसायात पुढे येऊन प्रगती साधणे आवश्यक आहे. सुमित कदम हे एम.एच १७ केक व्यवसायात स्वतःला झोकून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन माजी आ.चंद्रशेखर कदम यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड रोड लगत असलेल्या विवेकानंद नर्सिंग होम गेट जवळ एमएच-१७ केक & कॅफे शॉप शाखा उद्घाटन प्रसंगी माजी आ.कदम बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, देवळाली प्रवरा नगरपरिषद मुख्याधिकारी अजित निकत, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, कॉ. बाळासाहेब सुराडे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कदम म्हणाले की, ग्राहकांचे समाधान होण्यासाठी गुणवत्ता ही महत्वपूर्ण समजली जाते. केक व्यवसाय करत असताना सुमित कदम या होतकरू तरुणाने गुणवत्ता टिकून एम एच १७ केक शॉपची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली.म्हणूनच आज दुसरी शाखा सुरू केली. भविष्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी एम एच १७ केक & कॅफे शॉप शाखा होऊन ग्रामीण भागातील तरुणाचा एक ब्रँड तयार होईल यात शँका नाही.
माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की, जिद्द व चिकाटीच उत्तम उदाहरण म्हणजे एमएच १७ केक & कॅफे शॉपचे सर्वेसर्वा सुमित कदम असून कोविड काळात घरात बसून केक बनवून ग्राहकांना देण्याचे काम त्यांनी केले व आज त्या कष्टाचे फलित होऊन दुसरी शाखा सुरू केली आहे.
या कार्यक्रमास प्रियतमा कदम, प्रीती कदम, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे , आदर्श पतसंस्थेचे माजी व्हा.चेअरमन सुधाकर कदम, माजी नगरसेवक अमोल कदम,माजी नगरसेविका सुजाता कदम, उर्मिला शेटे, व्यापारी संघटना देवळालिचे अध्यक्ष सतीश वाळुंज, सुनील विश्वासराव, , शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील कराळे, योगगुरू किशोर थोरात, सुदर्शन जवळ, भास्कर कोळसे, वाघ सर आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूर्यकांत कदम, प्रकाश कदम, निलेश कदम, अजिंक्य कदम, सुमित कदम व कदम परिवाराने अथक परिश्रम घेतले.
एम एच १७ केक & कॅफे शॉपची सेवा
रसमलाई केक,चोको चीप्स केक,काजू कतली केक,ब्लॅक फॉरेस्ट केक,टेंडर कोकोनट केक,डच चॉकलेट केक,गुलाबजामुन केक,पायनॅपल केक,कुल्फी केक,मार्बल चॉकलेट केक,ब्लॅक फॉरेस्ट केक,मँगो केक,बटरस्कॉच केक,स्ट्रॉबेरी केक तसेच कार्टुन केक तसेच डॉल केक, अॅनिव्हर्सरी केक, एन्गेजमेंट केक, फ़ोनडंट थिम केक,हार्टशेप केक,फोटो प्रिंट केक,पिनाटा केक,फोटो रोल केक,क्राऊन केक आदी उपलब्ध.त्याचप्रमाणे सर्व प्रकारचा व्हेज पिझा, व्हेज बर्गर, ग्रील्ड, नॉनग्रील्ड सँडविच, कोल्ड कॉफी व मिल्क शेक उपलब्ध..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत