राहुरी/वेबटीम:- गेल्या ४ महिन्या पासून तालुक्यातील अपंग, विधवा महिला निराधारांची अनेक प्रकरणे केवळ संजय गांधी निराधार योजनेची बैठक न झाल्यान...
राहुरी/वेबटीम:-
गेल्या ४ महिन्या पासून तालुक्यातील अपंग, विधवा महिला निराधारांची अनेक प्रकरणे केवळ संजय गांधी निराधार योजनेची बैठक न झाल्याने मंजूर होऊ न शकल्याने ह्या लाभार्थीनी आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांची भेट घेऊ कैफियत मांडली असता शुक्रवार २३ जून रोजी सायंकाळी याचा जाब विचारणा करण्यासाठी आमदार तनपुरे ह्यांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार ह्यांची भेट घेण्यासाठी गेले असता तहसीलदार शासकीय कामासाठी बाहेर गेल्याचे उत्तर मिळाले पण त्याच वेळी प्रांतधिकारी किरण सावंत पाटील तहसील कार्यालयात उपस्थित असता आमदार तनपुरे यांनी ह्याबाबत त्यांना विचारणा केली असता गेल्या ४ महिन्यापासून सदर बैठक झाली नसल्याचे समोर येताच आमदार तनपुरे संतापले प्रांताधिकारी म्हणले कि, सोमवारी बैठक घेऊन प्रकरणे मंजूर करू.
राहुरी तहसीलदार यांच्या बेजबाबदारपणा मुळे त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी जिल्हाधिकारी ह्यांचे कडून कारवाई न झाल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात ह्या बाबत लक्षवेधी उपस्थित करून निलंबनाची कारवाई करण्यास भाग पाडू असा इशारा दिला
अनेक जणांनी तक्रारी केल्या. ह्या तक्रारीवरून समक्ष ह्याबाबत अडचण काय आहे, की प्रकरणे मंजूर करू नये ह्यासाठी काही राजकीय दबाव आहे का? ह्याची विचारणा करण्यासाठी आमदार तनपुरे ह्यांनी कार्यकर्ते व महिला अपंग निराधारासह थेट तहसील गाठले पण तहसीलदार काही शासकीय कामासाठी बाहेर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही पण त्याठिकाणी काही कामाचे निमित्ताने श्रीरामपूर विभागाचे नूतन प्रांत किरण सावंत पाटील तहसील मध्ये उपस्थित असल्याने आमदार तनपुरे ह्यांनी प्रांताना तीन मुद्दे मांडले
त्यात संजय गांधी योजनेची प्रकरणे ४ महिने होऊन सुद्धा मंजूर का झाली नाहीत, तहसील कार्यालयाचे आवारात शासनाचे अधिकृत सेतू कार्यालया असून त्याचे शेजारी अनेक अनधिकृत सेतू कार्यालये थाटली असून ते आवाच्या सव्वा पैसे उकलत असल्याचा आरोप करून सदर अनधिकृत सेतू कार्यालयावर तातडीने कारवाई करावी, व रेशन कार्ड बाबत तक्रारी,दक्षता समिती स्थापन का नाही ह्याबाबत मागणी केल.
राहुरी तहसीलदार यांच्या बेजबाबदारपणा बाबत जिल्हाधिकारी ह्यांचेशी आमदार तनपुरे भ्रमन ध्वनी द्वारे संपर्क करून वस्तुस्थिती सांगितली असता जिल्हाधिकारी ह्यांनी तहसीलदार ह्यांना कारणे दाखवा नोटीस काढतो असे सांगितले. परंतु आमदार तनपुरे हे तहसीलदार यांची निलंबनाची मागणी लावून धरली.
राहूरी तहसील कार्यालय हे भाजपचे कार्यालय आहे का असा सवाल आमदार तनपुरे यांनी केला.
यावेळी रवींद्र आढाव, संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पवार, सूर्यकांत उर्फ भिकूशेठ भुजाडी , बाळासाहेब उंडे ,प्रकाश भुजाडी, शहाजी जाधव ,महेश उदावंत, किरण पातोरे,ज्ञानेश्वर जगधने ,निलेश जगधने ,रामा तोडमल अमोल गुलदगड यांच्या सह दिव्यांग बांधव व विधवा महिला व निराधार महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत