गोमांस विक्री करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांची धडक कारवाई.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गोमांस विक्री करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांची धडक कारवाई..

अहमदनगर(वेबटीम)  गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झेंडीगेट परिसर...

अहमदनगर(वेबटीम)



 गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झेंडीगेट परिसरातील कारी मशिदीजवळ, व्यापारी मोहल्ला, हमालवाडा, कसाईगल्ली, अचानक चाळ रेल्वेस्टेशन या ठिकाणी गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्री करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

     कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाने छापेमारी करून गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. फिरोज फारुख कुरेशी (वय ३७,  रा.डॉ. आंबेडकर चौक, झेंडीगेट), आवेज फारुख कुरेशी (वय २१, रा.ब्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) जमील अब्दुल सय्यद (वय २८, रा.कोठला घासगल्ली), समीर अब्दुल सय्यद (वय २८, रा कोटला घासगल्ली अहमदनगर) रिजवान अय्युब कुरेशी (वय २३ वर्ष, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट अहमदनगर) पाच जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम २६९. महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५(अ), (क), ९ (अ) प्रमाणे ५ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे ३४० किलो वजनाचे गोमांस, पाच सत्तुर व पाच वजनकाटे असा एकुन ६८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

    पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, सलीम शेख, योगेश खामकर, अभय कदम, अमोल गाढे, संदिप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


तीन दिवसांत सहा ठिकाणी कारवाई

कोतवाली पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत गोमांसाची विक्री तसेच गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या सहा ठिकाणी कारवाई केली आहे. २४ जून रोजी पाच गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. त्यानंतर झेंडीगेट परिसरातील कारी मशिदीजवळ, व्यापारी मोहल्ला, हमालवाडा, कसाईगल्ली, अचानक चाळ रेल्वेस्टेशन या ठिकाणी कारवाई करण्यात आली. महिनाभरात दहा कारवाया करून १०,२१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


झेंडीगेट परिसरात पोलिसांची राहुटी..

गुरुवारी होणाऱ्या ईद च्या पार्श्वभूमीवर गोवंश यांची कत्तल होऊ नये यासाठी कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकर चौक झेंडीगेट या ठिकाणी कोतवाली पोलिसांनी तंबू ठोकला असून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत