राहुरी(वेबटीम) गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून देवळाली प्रवरा नगरपालिका व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी फॅक्...
राहुरी(वेबटीम)
गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून देवळाली प्रवरा नगरपालिका व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी फॅक्टरी व जोगेश्वरी आखाडा परिसरात तब्बल २०० वृक्षांचे रोपण करण्यात आले.
गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन व देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने राहुरी फॅक्टरी येथील रामेश्वर तोडमल यांच्या घरामागील प्लॉट, आरंगळे प्लॉट, स्वदेशनगर येथे १०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमास देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुख्याधिकारी अजित निकत, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, उदय इंगळे, शरद मुसमाडे सर, डॉ.सूरज महाडिक, दिलीप तनपुरे, प्रशांत तोडमल, बाबासाहेब पवार, रामेश्वर तोडमल, प्रशांत कोठुळे, वसंत कदम, डॉ.अमोल म्हसे, संतोष हारदे, प्रथमेश तनपुरे, शुभम मुसमाडे, कार्तिक आरंगळे, शिवराज शिंदे, प्रतीक डावखर, किशोर पवार, प्रदीप सोनवणे, मयुर तनपुरे, रोहित महाले आदिंसह गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते
यावेळी गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनच्या सदस्यांनी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसर हरित करण्याचा मानस व्यक्त केला.प्रितेश तनपुरे यांनी सर्वांचे आभार मानले.
तसेच जोगेश्वरी आखाडा येथे राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाची नूतन मराठी शाळा नंबर २ येथे गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन व राहुरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १०० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, प्रकाश भुजाडी, विलास तनपुरे, प्रशांत डौले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ.उषाताई तनपुरे यांनी गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनचे कौतुक करून पर्यावरण हिताच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी श्री.गुंजाळ, बाबासाहेब इरुळे, संदीप कदम, राजेंद्र बोरकर, मुख्याध्यापिका मॅडम, शेलार मॅडम, लोखंडे सर, भारमळ सर, गोरे सर, भगत मॅडम, राऊत मॅडम, सनी निमसे, दादासाहेब सरोदे, अंकुश काळे, श्री.पोखरकर, विद्यार्थी व ग्लोबल फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रास्तविक लोखंडे सर यांनी केले तर आभार प्रदीप सोनवणे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत