राहुरी(वेबटीम) आषाढी एकादशी व बकरी इद सण एकाच दिवशी साजरा होत असल्याने राहुरी तालुक्यातील कणगर येथील मुस्लिम बांधवानी या दिवशी कुरबानी न...
राहुरी(वेबटीम)
आषाढी एकादशी व बकरी इद सण एकाच दिवशी साजरा होत असल्याने राहुरी तालुक्यातील कणगर येथील मुस्लिम बांधवानी या दिवशी कुरबानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कणगर ग्रामपंचायत येथे आषाढी एकादशी व बकरी ईदनिमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांची एकत्रित बैठक पार पडली.
या बैठकीस सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच महंमदभाई इनामदार, पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे, गुलाब इनामदार, अजीज इनामदार, सुभेदार शेख, अन्सार शेख, दिलावर शेख, गुलाब शेख, जावेद शेख, आलम इनामदार, कासीम इनामदार, यशिन शेख, हारून इनामदार, सुभान इनामदार, चांद शेख, निसार शेख, नसिर शेख, सिराज इनामदार, अल्ताफ इनामदार, नदीम शेख आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी या बैठकीत मुस्लिम बांधवानी आषाढी व बकरी ईद एकाच दिवशी असल्याने कुरबानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन एकतेचा संदेश देण्यात आला.
प्रसंगी मुस्लिम व हिंदू समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत