राहुरी (प्रविण कोबरणे) राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या गणेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी कैल...
राहुरी (प्रविण कोबरणे)
राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या गणेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमन पदी कैलास नारायण कोबरणे यांची तर व्हा. चेअरमन पदी सौ सुनिता शिवाजी कोळसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी बी. व्ही. रायकर यांच्या अध्यक्षतेखाली सेवा संस्थेच्या सदस्यांची बैठक झाली. चेअरमन पदाची सूचना रोहिदास कोबरणे यांनी मांडली त्यास रखमाजी हारदे यांनी अनुमोदन दिले व्हा. चेअरमन पदाची सूचना भागवत कोबरने यांनी मांडली त्यास विशाल लाहुंडे यांनी अनुमोदन दिले यावेळी सदस्य अंजाबापू कोबरणे, विजय कोबरणे, भाऊसाहेब कोबरणे, लिलाबाई कोबरणे, कमलबाई कोबरणे हजर होते.
गणेगाव सेवा संस्थेने १ कोटी ८० लाख रुपये इतके कर्ज वाटप केलेले असून मागील पाच वर्षांपासून संस्थेची वसुली शंभर टक्के आहे. या निवडी प्रसंगी बापू कोबरने, केशव कोबरणे, बाबासाहेब कोबरने, चांगदेव कोबरने, पोपट कोबरने, बाळासाहेब कोबरणे, दत्तात्रय कोळसे, साहेबराव कोबरणे, बापूराव कोबरणे, नामदेव कोबरणे, आदिनाथ कोबरने, दत्तात्रय कोबरने, विकास कोबरणे, सतीश कोबरने, संस्थेचे सचिव बी.एम.राऊत, संस्थेचे मार्गदर्शक माजी भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे आदींसह सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन चेअरमन कैलास कोबरणे व व्हा चेअरमन सुनिता कोळसे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत