कोपरगावची कन्या दर्शना पवारचा मारेकरी राहुल कसा आला पोलिसांच्या जाळ्यात? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावची कन्या दर्शना पवारचा मारेकरी राहुल कसा आला पोलिसांच्या जाळ्यात?

  पुणे(वेबटीम) कोपरगाव येथील संजीवनी कारखान्यावर राहणारी एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक क...

  पुणे(वेबटीम)



कोपरगाव येथील संजीवनी कारखान्यावर राहणारी एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. राहुल हंडोरे वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथकं त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबईतून पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं आहे. राहुल हंडोरे याला अटक केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


राहुल अनेक राज्यांमध्ये फिरत होता


पोलिसांनी राहुल हंडोरे याचे लोकेशन शोधण्यासाठी एक युक्ती वापरली होती. त्या युक्तीचा फायदा राहुल हंडोरेला शोधताना झाला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी दर्शना पवार हिची ओळख पटवून तपासाला सुरुवात केली होती. तेव्हा दर्शनासोबत राजगडावर गेलेला तिचा मित्र राहुल हंडोरे गायब असल्याचे लक्षात आले होते. तेव्हापासून पोलीस राहुल हंडोरेचा शोध घेत होते. पुणे पोलिसांची पाच पथकं राहुल हंडोरेचा शोध घेत होती. राहुल हंडोरे हा अनेक राज्यांमध्ये फिरत होता. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा असा त्याचा प्रवास सुरु होता. मात्र, पुणे पोलिसांची पथकं त्याचा पाठलाग करत होती.


राहुल हंडोरेला अटक कशी केली?


पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या तपासाची फारशी माहिती बाहेर फुटून दिली नाही. पोलीस तपास मोहीमेबद्दल गुप्तता बाळगून होते. राहुल हंडोरे याला शोधण्यासाठी त्याच्या नातेवाईकांचीही मदत घेतली जात होती. पोलिसांनी राहुल हंडोर याचे लोकेशन शोधून काढण्यासाठी एक युक्ती वापरली होती. पोलीस राहुल हंडोरे याला त्याच्या नातेवाईकांच्या मोबाईल फोनवरुन पैसे पाठवत होते. जेणेकरुन राहुल हंडोरे याचे लोकेशन ट्रेस होऊ शकेल. त्यावरुन राहुल हंडोरे हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत असल्याचे पोलिसांना समजले आणि ते राहुलचा पाठलाग करत राहिले. अखेर राहुल हंडोरे याला मुंबईवरुन पुण्याकडे जात असताना पोलिसांनी अटक केली.


दर्शना पवारची हत्या केल्याची कबुली


पोलिसांनी अटक केल्यानंतर राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यासंदर्भात पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. राहुल हंडोरे आणि दर्शन पवार हे दोघेही पुण्यात एमपीएससीचे शिक्षण घेत असताना भेटले होते. हे दोघे एकमेकांचे नातेवाईकही होते, ते आधीपासूनच एकमेकांना ओळखायचे, ही बाब तपासादरम्यान समोर आली आहे. आता राहुल हंडोरेच्या चौकशीतून या हत्याप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आणि इतर तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.



माझ्याकडे द्या मी त्याचे तुकडे करते...दर्शनाच्या आईची प्रतिक्रिया 


मला तिथे घेऊन जा, माझ्या मुलीचे जसे तुकडे केले, तसे मी त्याचे तुकडे करेन. एकटीच करेन मी. जशी त्याने माझ्या मुलीची हत्या केली, तशीच मला त्याची हत्या करायची आहे. मला फक्त तिला न्याय द्यायचा आहे आणि तो मीच देणार. आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तो राहिलाच नाही पाहिजे. अजून १० मुलींचं पुढे नुकसान होईल. माझी तर गेली पण अजून इतरांच्या मुली जावू नये, त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असं सुनंदा पवार म्हणाल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत