राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील ब्युटी पार्लरचा आग लागल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली असताना पुन्ह...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड येथील ब्युटी पार्लरचा आग लागल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली असताना पुन्हा नव्याने व्यवसायात उभारी घ्यावी यासाठी साई आदर्श मल्टिस्टेटच्यावतीने काही दिवसांपूर्वी ब्युटी पार्लर चालक महिलेला आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला होता. तर आज आदर्श नागरी पतसंस्था व श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशनचे वतीने मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे.
श्रीरामपूर रोड येथे स्व. गुलाबराव कदम यांच्या कॉम्प्लेक्समधील कोमल कोळसे यांच्या मालकीच्या तन्वी ब्युटी पार्लरला अचानक आग लागली. या आगेत पूर्ण दुकान जळून खाक होऊन अंदाजे ४ ते ५ लाखांचे अतोनात नुकसान झाले.
यावेळी आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते व सहकाऱ्यांनी जळीत दुकानाची पाहणी करत कोळसे कुटुंबियांस धीर देत पुन्हा नव्याने व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा शब्द दिला होता.
त्यानुसार आज आदर्श नागरी पतसंस्था व श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने ब्युटी पार्लरच्या संचालिका कोमल कोळसे यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
यावेळी आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते,दि.राहुरी अर्बन संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे,आदर्श नागरीचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज योगगुरू किशोर थोरात,व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील विश्वासराव,संचालक मारुती खरात,निवेदक आप्पासाहेब ढोकणे आदी उपस्थित होते.
यावेळी ब्युटी पार्लरच्या संचालिका कोमल कोळसे यांनी आदर्श पतसंस्था व श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशनचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत