नगर विशेष प्रतिनिधी : गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुनिल मच्छिंद्र चव्हाण (वय...
नगर विशेष प्रतिनिधी
: गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुनिल मच्छिंद्र चव्हाण (वय ४० वर्षे, रा. बाजारतळ, आष्टी जि.बीड) असे आरोपीचे नाव असून त्याच्याजवळून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा ६२ हजार १०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गावठी कट्टा बाळगणाऱ्यावर कोतवाली पोलिसांची महिनाभरातील ही दुसरी कारवाई आहे.
शहरातील कै.माजी खाजदार दिलीप गांधी यांच्या घराजवळील आनंदधाम गेट येथे एक इसम संशयितरित्या मोटरसायकलवर थांबलेला असून त्याच्या कंबरेला गावठी कट्टा असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शोध पथकाने सापळा रचून मरुन व अंजिरी रंगाचा फुल बाहीचा टी-शर्ट व ग्रे रंगाची पॅन्ट घातलेल्या एकाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कंबरेला एक गावठी कट्टा व मॅग्झीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली. कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सोमनाथ आसाराम राऊत यांच्या फिर्यादीवरून सुनिल मच्छिंद्र चव्हाण याच्यावर गुन्हा रजि नंबर ६५७ / २०२३ भारतीय शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत .
पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, मनोज महाजन, पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, रविंद्र टकले, अभय कदम, सतिष शिंदे, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे, सतिष भांड, संतोष जरे यांच्या पथकाने ही कारवाई केली
आरोपी सुनिल मच्छिंद्र चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आष्टी पोलीस ठाणे (जि.बीड) येथे खालील प्रमाणे चोरी घोरपडी व अवैध दारू विक्रीचे ३ गुन्हे दाखल आहेत..
१६९/२०२२ भादंवि क ३९२, ३२३, ५०४
७६/२००३ भादंवि क ४५७,३८०
४७/२०२२ मुं.प्रो. ॲक्ट ६५ (ई)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत