राहुरी(वेबटीम) वडिलांनी आईचा खून केल्याने आई देवाघरी तर वडील जेलची हवा खात आल्याने रस्त्यावर आलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च राहुरी तालु...
राहुरी(वेबटीम)
वडिलांनी आईचा खून केल्याने आई देवाघरी तर वडील जेलची हवा खात आल्याने रस्त्यावर आलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नान्नोर यांनी करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
गेल्या महिन्यात काळजाला पिळवटून टाकणारी दुर्दैवी घटना डिग्रस गावात घडली. या घटनेत अवघे 30 वय असलेली कै. अनिता सुरेश पवार हिची पतीने हत्या केली. तिचा पती सुरेश पवार जेलची हवा खात आहे.
नियतीच्या या विचित्र खेळात दोन लहानगे चिमुकले मात्र उघडयावर पडली .अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात या चिमुरड्यांच मायेचं छत्र मात्र कायमचे हरपले व हे दोन्ही लेकरं आईवडिलांविना पोरकी झाली. मयत अनिताच्या अंतीम संस्कारच्या वेळी वैशाली नान्नोर उपस्थित होत्या. तेव्हा आई आपल्याला कायमची सोडून गेली या वेदनेने या चिमुरड्यांचा हंबरडा मात्र काळजाला हेलावून टाकणारा होता आणि त्याच वेळी वैशाली नान्नोर यांनी लेकरांना मायेने जवळ घेत सांगितले की यापुढे काहीही गरज पडली तर बिनधास्त माझ्या घरी यायचं
चार दिवसांपूर्वी ही लेकरं वैशाली नान्नोर यांच्याकडे आली.आणि बोलू लागली की मॅडम आम्हाला शाळेत जायचं आहे "दप्तर, वह्या,पेन ,पेन्सिल पाटी द्या" म्हणून दोन दिवसांपूर्वी या लेकरांना आधारवेल फाऊंडेशन च्या वतीने शालेय साहित्य दिले तसेच त्यांना या पुढील शिक्षणासाठी देखील मदत करणार असल्याचे सांगितले
लेकरांची आई मात्र पुन्हा कधीच परतून येणार नाही पण काळोखाच्या अंधारात प्रकाश देणाऱ्या काजव्या प्रमाणे मी नक्कीच माझ्या जीवात जीव असेपर्यंत या लेकरांना पुढील शिक्षणासाठी नक्की मदत करेल असे वैशाली नान्नोर यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत