कोपरगाव(वेबटीम) भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत काम करत असताना शंकरराव चव्हाण यांनी न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसा...
कोपरगाव(वेबटीम)
भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत काम करत असताना शंकरराव चव्हाण यांनी न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे विद्यालयाच्या बाबतीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
न्यायालयीन लढाईत सुप्रीम कोर्टापर्यंत न्यू इंग्लिश स्कूल कमिटीच्या माध्यमातून भक्कम पुरावेही उभे केले. त्यामुळे संस्थेला समृद्धी महामार्गात बाधित झालेल्या जागेचा व इमारतीचा मोबदला देण्याचे न्यायालयाने निकाल दिले. स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पडली. त्यामुळे त्यांची संचालकपदी निवड भारत सर्व सेवा संघ पाचेगाव या शैक्षणिक संस्थेवर बिनविरोध करण्यात आली. संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र नलगे, सचिव प्रकाश जाधव व सर्व संचालक मंडळांनी चव्हाण यांना दिलेला शब्द पाळून तो एकमताने पूर्ण केला असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंदराव चव्हाण यांनी केले.ते कोपरगाव तालुक्यातील चांदकासारे येथे चांदे विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने चव्हाण यांच्या निवडी बद्दल सत्कार करताना बोलत होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दगु होन, उपाध्यक्ष मधुकर खरात,गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापुराव जावळे, उपसरपंच सचिन होन, सचिव संदीप फटागरे, चद्रकांत होन,धनंजय चव्हाण,किरण होन,शरद होन,हसन सय्यद,विलास चव्हाण, सतिष चव्हाण,सुरेश चव्हाण, आबासाहेब दहे, प्रभाकर जावळे अदी उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना शंकरराव चव्हाण यांनी सांगितले की भारत सर्व सेवा संघाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचे जबाबदारीने पालन करून चांदेकसारे विद्यालयात शिकणाऱ्या शेकडो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोबदला मिळालेल्या पैशातून सुसज्ज इमारत बांंधुन विविध सुविधा संस्थेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केल्या जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष मधुकर खरात यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत