वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या गु...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



 वैष्णवी चौक येथे राहुरी कॉलेज, छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कुल, डी पॉल इंग्लिश मीडियम स्कुलमधील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, पेन व डायरी देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास डॉ.अनंतकुमार शेकोकार, शिवचरित्रकार हसन सय्यद, वैष्णवी चौक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वसंत कदम, मेघना गांडूळे, वैष्णवी चौकचे अध्यक्ष अमोल कदम आदी उपस्थित होते.


प्रारंभी प्रास्तविक वसंत कदम यांनी केले. यावेळी बोलताना डॉ.अनंतकुमार शेकोकार म्हणाले की, वैष्णवी चौक नेहमीच वेगवेगळ्या उपक्रम राबविण्यात अग्रभागी असतात. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले असल्याचे ते म्हणाले.


शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी नितीन मोरे, मनोज तांबे,बाळासाहेब वाळुंज,प्रसाद कदम, मनोज गावडे, बाबासाहेब खांदे,प्रथमेश थोरात, अनिल जाधव आदिंसह वैष्णवी चौकचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार श्रीकांत जाधव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत