श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर येथील श्रीमती गंगुबाई निर्वाण सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा गौरव सोहळा प्रति...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर येथील श्रीमती गंगुबाई निर्वाण सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा गौरव सोहळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विश्वनाथ निर्वाण यांच्या पुढाकाराने स्वयंवर मंगल कार्यालय येथे पार पडला.
यविविध क्षेत्रातील समाजभिमुख कार्य करणा-या डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, सौ. मयुरा बनकर, श्रीमती रमादेवी सतीश धीवर, सौ. कल्पना सुभाष वाघुंडे, सौ. सारिका आण्णासाहेब मोहन, सौ. आशा गोरख सोनवणे, सौ. ललिता तडके, सौ. फरिदा अन्सार शेख, सौ. जनाबाई गणपत घनदाट, सौ. कावेरी पोपट साबळे, सौ. उषा अशोक गाडेकर आदी महिलांना सन्मानीत करण्यात आले.
श्विश्वनाथ निर्वाण यांनी प्रतिष्ठानची माहिती दिली. प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी "जीवन सुंदर आहे' या विषयावर व्याख्यान दिले. वंदनाताई मुरकुटे, चर्मकार समाजाचे संस्थापक, अध्यक्ष शिवाजीराव साळवे तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वसंतराव पाटील यांचे प्रेरणादायी भाषण संपन्न झाले
या कार्यक्रमास काँग्रेसचे सचिव हेमंतराव ओगले उपस्थित होते तर माऊली वृद्धाआश्रमचे सुभाष वागुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत