राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात असलेल्या एका इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थीनी ही बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात असलेल्या एका इंग्लिश मिडीयम स्कुलची विद्यार्थीनी ही बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. सदर स्कुलमधील बस चालकाने तिचे अपहरण केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
नरसाळी (बेलापूर) येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी देवळाली प्रवरातील एका इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शिक्षण घेते. दोन दिवसापूर्वी पहाटे ती बेपत्ता झाली नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत असलेल्या देवळाली प्रवरातील इंग्लिश मिडीयम स्कुलमधील ३५ वर्षीय बस चालक बेपत्ता असून त्यानेच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचे तिच्या नातेवाईकांनी म्हंटले आहे.
याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात मिसिंगबाबत तक्रार केली आहे. सदर अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी आम्हाला आमची मुलगी मिळवून न्याय द्या अशी मागणी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत