राहुरीत आ.तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत आ.तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा

राहुरी(वेबटीम) राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्ताने माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या जनसंपर्क क...

राहुरी(वेबटीम)



राष्ट्रवादी काँग्रेसच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्ताने माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रम आयोजित करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ झेंडावंदन करून अभिवादन करण्यात आले.


 राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी श्री सोनवणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन सर्वसामान्य नागरिक व गोरगरीब जनतेसाठी पक्षाने सातत्याने कामगिरी केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी अधिक योगदान देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ताळागाळापर्यंत काम करावे केंद्र व राज्य सरकारने स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना अटकाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे असे असले तरी पक्षाने त्या संकटाला धैर्याने सामोरे जाऊन सत्ताधाऱ्यांना उघडे पाडले आहे. आगामी काळातील निवडणुकांना सामोरे जात असताना राष्ट्रवादीला उज्वल भवितव्य असल्याचे श्री सोनवणे यांनी सांगितले.


 यावेळी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील आडसुरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव ,डॉ आसाराम शिंदे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली यावेळी डॉक्टर ,वकील ,इंजिनियर अशा विविध मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब लटके, सुरेश निमसे, बाजार समितीचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ पवार, संचालक मधुकर पवार, दत्तात्रय कवाणे, डॉ तनपुरे कारखान्याचे माजी संचालक भारत तारडे, डॉ.राजेंद्र बानकर ,डॉ प्रकाश पवार सचिन भिंगारदे ,दिनेश तनपुरे, सुजित वाबळे ,किशोर जाधव ,माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी , बाळासाहेब उंडे ,माणिक तारडे, नवाज देशमुख, अड कचरू चितळकर, पंढरीनाथ पाटोळे, जालिंदर आडसुरे, नितीन बाफना, दत्तात्रय तनपुरे, प्रशांत सप्रे ,सुरेश करपे ,मंजाबापू कोबरणे ,सलीम शेख, रघुनाथ मुसमाडे यांचे सह पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत