राहुरी(वेबटीम) शांत स्वभावाचा पोलिस अधिकारी हा सिंगम असू शकतो हे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी राहुरीत केलेल्या कामातून दाखवून दिले असून...
राहुरी(वेबटीम)
शांत स्वभावाचा पोलिस अधिकारी हा सिंगम असू शकतो हे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी राहुरीत केलेल्या कामातून दाखवून दिले असून निष्ठेने सेवा बजावत तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवून शांतता आणि सलोखा राखण्याचे कार्य आपल्या ४ ते ५ महिन्याच्या कालावधीत केले असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले.
राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे हे ३१ मे रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असता राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात बुधवारी सायंकाळी सेवापूर्ती सोहळा पार पडला प्रसंगी स्वाती भोर बोलत होत्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार चंद्रजित राजपूत, सत्कारमूर्ती पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके म्हणाले की,राहुरी पोलीस ठाणे हद्दीत कामाचा मोठा व्याप आहे. येथे काम करत असताना मोठी कसरत करावी लागते. डांगे यांनी याठिकाणी कमी कालावधीत काम केले, पण या काळात त्यांनी अत्यंत शांत, संयमी पद्धतीने काम केले त्यांची आजपर्यंत केलेले काम हे निश्चित प्रेरणादायक आहे. त्यांनी अल्पावधीत काळात राहुरीला आपलेसे केले आहे.
सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे म्हणाले की, आपल्या नोकरीच्या काळात खुप वेगवेळे अनुभव आले. घराचा वारसा सुसंस्कृत असल्याने नेहमीच आपल्या कामात चांगला उद्देश ठेवला. त्यामुळे काम करताना कधी अडचणी निर्माण झाल्या नाहीत. पोलीस दलात काम करत असताना राष्ट्रपती पदकासह पोलीस महासंचालकपद देखील प्राप्त झाले. राज्यातील वेगवेगळया भागात काम करताना वेगवेगळे अनुभव मिळाले पण आपल्या जिल्ह्यात काम करताना खुप चांगले अनुभव मिळाले. राहुरीत काम करताना निश्चीतच वेगवेगळे अनुभव व येथील जनतेचे प्रेम मिळाले.
प्रसंगी राहुरीतून अन्य पोलीस ठाण्यात बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान संपन्न झाला
यावेळी शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे , तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुरसिंगरराव पवार, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, अभि गाडे, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजकीय, सामाजिक, धार्मिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सज्जकुमार नार्हेडा, नीरज बोकील, महादेव शिंदे आदिंसह पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रभारी चार्ज करपे यांच्याकडे
राहुरी पोलीस ठाण्याचा प्रभारी चार्ज शनि शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र करपे यांच्याकडे दिला सलून त्यानुसार त्यांनी पदभार स्वीकारला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत