शासन आपल्या दारी योजना जनतेच्या हितावह.. लोखंडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शासन आपल्या दारी योजना जनतेच्या हितावह.. लोखंडे

कोपरगाव(वार्ताहर)  महाराष्ट्र राज्यामध्ये जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय होत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवें...

कोपरगाव(वार्ताहर)



 महाराष्ट्र राज्यामध्ये जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय होत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार म्हणजे जनतेचे सरकार असल्याचं प्रतीक ठरत आहे. शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत विविध विभागाचे अधिकारी महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीत जाऊन विविध योजनेचे कागदपत्र नागरिकांकडून घेत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी होणारी धावपळ थांबली आहे. या सरकारची ही योजना जनतेच्या हितासाठी असल्याचे कोपरगाव तालुका शिवसेनेचे संघटक देविदास लोखंडे यांनी सांगितले.

खा. सदाशिवराव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील विविध भागात देविदास लोखंडे यांनी भेट देत नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडल्या आहेत. ही योजना सुरू झाल्यामुळे महसूल ,वीज, कृषी विभाग,  आरोग्य विभाग, शिक्षण विभाग,  ग्रामपंचायत विभाग, पशुवैद्यकिय विभाग स्वतंत्र टेबल लावण्यात येत आहे. ग्रामस्थ कागदपत्र घेऊन येतात व अधिकाऱ्यांमार्फत लगेच त्यांचे समाधान करण्यात येत आहे.


संजय गांधी, श्रावण बाळ कुटुंब अर्थसहाय्य, रेशन कार्ड अन्न सुरक्षा दुबाररेशनकार्ड शैक्षणिक दाखले बोनोफाईड ग्रामपंचायत स्तरावरील जन्म मृत्यु विवाह नोंदणी रहिवाशी दाखला संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी ग्रामस्थांना माहिती देत कागदपत्राची पूर्तता करण्यास आपला वेळ दिला आहे.


 तालुक्यातील नागरिकांनीही योजना चा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत