अल्पवयीन मुलीची छेडछाड, राहुरी पोलिसात विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अल्पवयीन मुलीची छेडछाड, राहुरी पोलिसात विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

  राहुरी(वेबटीम) १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत येताना जाताना तीची छेडछाड करण्यात आली. तसेच तू जर माझ्याशी बोलली नाहीतर तूझ्या सोबत काढलेले ...

 राहुरी(वेबटीम)



१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत येताना जाताना तीची छेडछाड करण्यात आली. तसेच तू जर माझ्याशी बोलली नाहीतर तूझ्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या घटने बाबत राहुरी पोलिस ठाण्यात विनयभंगा सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


          या घटनेतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शाळेत शिक्षण घेत आहे. ती शाळेत जाताना व येताना आरोपी करण अनिल जाधव, रा. आरडगाव, ता. राहुरी. हा तीची नेहमीच छेडछाड करून तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तू मला फार आवडतेस असे म्हणून तीला वारंवार त्रास देत होता. ती अल्पवयीन मुलगी त्यांचे दुकानात गिऱ्हाईक करीत असतांना आरोपीने तीच्या सोबत त्याचे मोबाईलमध्ये सेल्फी फोटो व व्हीडीओ काढुन घेतले. तु जर माझ्याशी बोलली नाहीतर आपले दोघांचे फोटो व व्हीडीओ व्हायरल करील अशी धमकी दिली.


        घटनेनंतर त्या अल्पवयीन मुलीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला. तीच्या फिर्यादीवरून आरोपी करण अनिल जाधव, रा. आरडगाव, ता. राहुरी. याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ५८७/२०२३ भादंवि कलम ३५४, ३५४(ड), ५०६ तसेच पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


           या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत