ब्राम्हणी(वेबटीम) गावचे भूमिपुत्र कर्नल सुनील रामदास राजदेव यांचे सुपुत्र चि. तन्मय सुनील राजदेव यांची लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल...
ब्राम्हणी(वेबटीम)
गावचे भूमिपुत्र कर्नल सुनील रामदास राजदेव यांचे सुपुत्र चि. तन्मय सुनील राजदेव यांची लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल ब्राह्मणी सहकारी सोसायटी व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सत्कार सोहळ्याच प्रास्ताविक गणेश हापसे यांनी केले.यावेळी चेअरमन दादासाहेब हापसे,व्हा.चेअरमन श्रीकृष्ण तेलोरे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश बानकर,सरपंच प्रकाश बानकर, संचालक बाळासाहेब देशमुख,शिवाजी राजदेव,अशोक नगरे, पंडित हापसे, नंदकुमार बल्लाळ,पोपट राजदेव,राम राजदेव, सतिष बानकर, अनिल सावंत, सचिव अशोक आजबे आदीसह सोसायटीचे सभासद, कर्मचारी,ब्राम्हणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील तरुणांना लष्करात सेवेची संधी मिळावी यासाठी अनुभवाचा व अभ्यासाचा उपयोग करणार असून त्यासाठी गावातील युवकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. गावच्या विकासासाठी सहकार्य राहील असे आश्वासन मनोगत व्यक्त करताना लेफ्टनंट तन्मय राजदेव यांनी केले.
१० जून रोजी तन्मय राजदेव यांचा डेहराडून येथे दीक्षांत सोहळा पार पडला. भारतीय सेना दलाचे जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते तन्मयला लेफ्टनंट म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी वडील कर्नल सुनील राजदेव आई आशा राजदेव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत