देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील सर्वधर्मीय देवस्थानचा पायी दिंडी सोहळा शुक्रवार दि १६ जुन रोजी पंढरपुरकडे प्रस्थान करत असुन दि...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील सर्वधर्मीय देवस्थानचा पायी दिंडी सोहळा शुक्रवार दि १६ जुन रोजी पंढरपुरकडे प्रस्थान करत असुन दिंडीचे तपपुर्तीचे १२ वे वर्ष असुन या निमित्त दिंडी सांगतेनिमित्त धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिंडीचे अध्यक्ष श्री दत्ता कडुपाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.
सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री समर्थ बाबुराव पाटील महाराजांचे १०० वर्षांपूर्वीचे मंदीर देवळाली प्रवरा बाजारतळावर आहे. देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांची श्री समर्थ बाबुराव पाटील यांचेवर नितांत श्रध्दा आहे.मंदीराचे परिसरांत असलेल्या दगडी शिळेला पाठ टेकवली तर तुमची पाठदुखी बरी होत असल्याची शहरवासीयांची श्रध्दा आहे.बाबुराव पाटील थोर साधुपुरुष होते.त्यांनी अनेकांना झाडपाल्याचे औषध देवुन बरे केल्याच्या अनेक कथा जुन्या पिढीतील मंडळी सांगतात. त्यात इंदोरच्या राणीला बरे केल्याची कथा बहुचर्चित आहे.
दिंडी १६ जुनला सकाळी १० वा प्रस्थान करेल त्यानंतर कोंढवड, वांबेरी, बु-हानगर ,शिरोढोण,बनपिंप्री.मिरजगांव,डाकु निमगांव,करमाळा,आदिनाथ कारखाना,टेंभुर्णी ,परिते,विठ्ठल कारखाना नंतर पंढरपुरात एकादशीचे आदल्या दिवस पंढरपुरात पोहचेल. तिथे दोन दिवस मुक्काम करुन वारी परतीचा मार्गी लागेल.
दि २ ,३ जुलै रोजी दिंडी तपपुर्ती सोहळा नगरपरिषदेच्या श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज सभागृहात पार पडेल.या निमित्ताने दि २ जुलै रोजी सकाळी ९.०० वा हभप श्री गोरक्षनाथ शिंदे यांचे प्रवचन,१०.३० वा हभप किशोरमहाराज जाधव मानोरी यांचे किर्तन दुपारी वारकरी व गुणीजन सत्कार न सत्संग दु ४.०० चंद्रेश्वर प्रासादिक भारुड मंडळ चांदेगांव यांचा भारुडाचा कार्यक्रम. सायं ७.०० हभप श्री दुर्गाप्रसाद तिडके याचे हरिकिर्तन नंतर हरिजागर. दि ३ जुलै रोजी समारोपाचे किर्तन हभप संपुर्णाताई नागपूरकर यांचे होवुन महाप्रसादाने दिंडीचे तपपुर्ती कार्यक्रमाची सांगता होईल.
या भक्तीमय पर्वणीचा आनंद घेण्याचे आवाहन दिंडी कमेटी सदस्य भाऊसाहेब गडाख, एकनाथ पठारे ,शिवराम कडु,अशोक गवळी ,शिवाजी बोंबले,राजेंद्र पंडीत , अजिंक्य कडुपाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत