श्रीरामपूर येथे रविवारी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर येथे रविवारी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर

श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड येथील मा.खा. गोविंदराव आदिक सभागृहात हेमंत ओगले मित्र मंडळ व साई सोशल फाउंडेशनच्यावतीने रव...

श्रीरामपूर(वेबटीम)



श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड येथील मा.खा. गोविंदराव आदिक सभागृहात हेमंत ओगले मित्र मंडळ व साई सोशल फाउंडेशनच्यावतीने रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी १० ते १ या वेळेत १० वी व १२ वी, पदवीधर तसेच स्पर्धा परीक्षा संदर्भात मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


यावेळी  तज्ञ करिअर मार्गदर्शक प्रा.संतोष कार्ले उंडणगावकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णा प्रकाश(IPS), रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ विभागीय अधिकारी डॉ.तुशाबा शिंदे(IRPS) , नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त(IAS) आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या श्रीमती मीनाताई जगधने असणार आहेत.

यावेळी माजी आ.भानुदास मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.,


 तरी या मोफत करिअर मार्गदर्शन शिबिरासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन हेमंत ओगले मित्र मंडळ व साई सोशल फाउंडेशन यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत