शिर्डी(राजेंद्र भुजबळ यांजकडून) मंडळी एरव्ही पत्रकार आणि पोलीस यांचा छत्तीसचा आकडा असतो हे अनुभवल आहे मात्र आज माझा अनुभव जरा वेगळा आहे. १...
शिर्डी(राजेंद्र भुजबळ यांजकडून)
मंडळी एरव्ही पत्रकार आणि पोलीस यांचा छत्तीसचा आकडा असतो हे अनुभवल आहे मात्र आज माझा अनुभव जरा वेगळा आहे. १२ जून रोजी शिर्डीमध्ये साई गणेश गॅस एजन्सी जवळ १० kv फेडरवर काही झाडांच्या फांद्या ह्या विद्दुत वाहिनीला अडथळा निर्माण करत होत्या , यासाठी शिर्डीतील महावितरण कंपनीने संत गोरोबा एजन्सी चे सुपरवायझर नवनाथ पोकळे यांना कळविले कारण ते झाडे कटिंग करण्याचे कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घेऊन सदर ठिकाणचे अडथळा निर्माण करणारे गुलमोहराचे झाड तोडण्यास काही मजूर पाठविले त्यात विजय मारुती निकम हा ४० वर्षाचा तरुण होता. तो सदर झाड तोडण्यासाठी काम करत असताना दुर्दैवाने एक मोठी फांदी अचानक तुटून त्याच्या डोक्यावर पडली व त्यात तो जागेवर मृत्युमुखी पडला. त्याचा रीतसर पंचनामा होऊन बॉडी शवविच्छेदनासाठी राहाता येथील शासकीय रुग्णालयात पाठवून पुढील सर्व अंतविधी प्रक्रिया महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत पोहेगाव येथे पार पडले. मात्र सदर मयत इसम हा आदिवासी कुटुंबातील आहे, त्याला ८ व १० वर्षाचे दोन मुले पत्नी असा परिवार असून त्याच्या जाण्याने त्याचा संसार उघडा पडला आहे.
घटनेच्या दिवशी शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार हे बाहेरगावी होते म्हणून त्यांना काहीही माहीत नव्हते मात्र एक संवेदनशील पत्रकार म्हणून मी सर्व माहिती घेतली त्यावेळी एक भयानक वास्तव समोर आलं ते म्हणजेच ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या आदिवासी युवकाचा मृत्यू झाला त्याने सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नव्हते अर्थात हेल्मेट, सुरक्षा बेल्ट यासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा विमा यासर्व गोष्टींचे उल्लंघन तर केलेच होते मात्र एका गरीब आदिवासी मजुराचा मृत्यू होऊनही नवनाथ पोकळे जागेवर व अंत्यसंस्कारावेळी हजर नव्हता हे निर्दयी माणसाचे लक्षण सर्वांनी अनुभवले मात्र शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या निदर्शनास ही बाब मी आणून दिली व त्यांनी तात्काळ वयक्तिक लक्ष घालून मयत विजय निकम यांच्या नातेवाईकांशी व पत्नीशी संपर्क करून सदर गुन्हा हा गंभीर असून त्याद्वारे न्याय देताना मयत विजय निकम यांच्या पत्नीला धीर देत मी तुमचा मोठा भाऊ आहे आणि यासाठी तुम्ही प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दाखल करा आणि यातून मी तुम्हाला न्याय मिळवून देईल असं सांगितल्यावर मयताची पत्नी ढसाढसा रडू लागली. हा सर्व प्रकार माझ्या समोर आणि मी केलेल्या पाठपुराव्यामुळे मी अनुभवत होतो म्हणून एक पत्रकार म्हणून बतमीपेक्षा खाकी वर्दीतील एक देवमाणसाचे मला दर्शन झाले म्हणून शब्दाला वाट मोकळी करून देऊन माझ्या सत्य घटनेचा अनुभव आपल्यासमोर एक पत्रकार म्हणून मांडत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत