'साई प्रवरा' मार्फत शासकीय कांदा खरेदीस सुरुवात - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'साई प्रवरा' मार्फत शासकीय कांदा खरेदीस सुरुवात

आंबी(वेबटीम) नाफेड व महाएफपीसी यांच्या संयुक्त विद्यमाने साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि. चिंचोली अंतर्गत  केसापुर (ता. राहुरी) येथे श...

आंबी(वेबटीम)



नाफेड व महाएफपीसी यांच्या संयुक्त विद्यमाने साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि. चिंचोली अंतर्गत  केसापुर (ता. राहुरी) येथे शासकीय  कांदा खरेदी सुरू झाली असल्याची माहिती कंपनीचे सचिव दादासाहेब मेहेत्रे यांनी दिली. साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात नावारूपाला आली आहे. नाफेड, महाएफपीसी यांच्यामधील दुवा म्हणून कंपनीने शेतकऱ्यांच्या विश्वास संपादित केला आहे. केसापूर येथे नाफेडचा अत्याधुनिक व सर्व सोयीसुविधायुक्त एक हजार टन क्षमता असलेला कांदा साठवणूक प्रकल्प कार्यान्वित आहे.


कंपनीच्या कार्यालयात कांदा खरेदी व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी आधार कार्ड झेरॉक्स, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, पिक पेरा नोंद असलेला सातबारा उतारा हि कागदपत्रे जमा करावेत असे आवाहन अध्यक्ष संभाजी नान्नोर, उपाध्यक्ष नंदकिशोर मूसमाडे, सचिव दादासाहेब मेहेत्रे, कार्यकारी संचालक सुनिल साबळे, संचालक मंगल रायभान जाधव, संगीता राजेंद्र वडीतके, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष मेहेत्रे, लेखापाल अमृत शिरसाठ यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत