राहुरी(वेबटीम) घरफोडी व चोरी टाळण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत पत्रक प...
राहुरी(वेबटीम)
घरफोडी व चोरी टाळण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबाबत पत्रक प्रसिध्दीला दिले आहे.याद्वारे पोलीस निरीक्षक जाधव यांनी खालीलप्रमाणे आवाहन केले आहे
१) नागरिकांनी गावी जाताना आपल्या शेजारी राहणान्यांना बाहेरगावी जात असलेबाबत माहिती द्यावी.
२) गावी जाताना शक्यतो घराचे दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. तसेच घराचे मागील व पुढीलदारास लोखंडी जाळींचा दरवाजा लावावा मुख्य दरवाजास दणगट कडी कोयंडा बसवावा.
(३) गावी जाताना शक्यतो घरातील पैसे, दागिने व मौल्यवान चिजवस्तु बँकेच्या लॉकर मध्ये ठेवावी.
४) शक्य असल्यास घराच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावीत. ५) रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेरील लाईटस् चालू ठेवावीत.
(६) आपले परिसरात येणारे फेरीवाले सेल्समन भिक्षा मागणारे तसेच इतर संशयित यांचे नाव पत्ता विचारून त्यांचे मोबाईल मध्ये फोटो घेवून ठेवावे.
(७) आपले कॉलनी व परिसरात अनोळखी व्यक्ती फिरत असल्यास त्याची व्यक्तिगत चौकशी करावी, व संशयित वाटल्यास ११२ नंबरवर कॉल करुन त्याबाबत माहिती कळवावी. ८.) लॉकरमध्ये ठेवणे शक्य नसल्यास मोल्यवान वस्तु सामान्यतः जेथे ठेवतात अशा ठिकाणी ठेवु नका. जसे कि, कपाट, बेंड,
किचनमधील डबे, धान्याची कोटी इ. ९) आपण बाहेरगावी गेल्यावर सोशल मिडियावर ( इंस्टाग्राम, व्हॉटसअप, फेसबुक ) फोटो, व्हिडिओ, लोकेशन इत्यादी बाबत कोणतीही पोस्ट करु नये.
(१०) आपण बाहेर गावी जात असल्याची कल्पना आपल्या शेजाऱ्यांना दयावी शिवाय आपला मोबाईल नंबर, नातेवाईकांचा मोबाईल नंबर पत्ता त्यांचे कडे दयावा.
११) रात्रीच्या वेळी गाव / वाडी / वस्ती / प्रभाग या ठिकाणी गावातील तरुणांनी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून गस्त करावी.
१२) आपणांस जास्त काळ बाहेरगावी जावयाचे असल्यास आपल्या नातेवाईकांस रात्रीच्या वेळी घरी झोपण्यास सांगावे.
१३) घरी वा दुकानात नोकर असल्यास त्याची सर्व माहिती उदा. त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, त्याचा मोबाईल नंबर, त्याचे नातेवाईक यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती घेवुन ठेवावी.
(१४) दिवसाची घर फोडी हि साधारणतः दुपारी १२.०० ते ०६.०० या दरम्यान होतात त्यावेळी बाहर जात असल्यास आपल्या शेजारी यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगुनच बाहेर जावे.
१५) आपण राहत असलेल्या परिसरात रात्रगस्त करिता सार्वजनिक सुरक्षारक्षक नेमावा तसेच शक्य झाल्यास सीसीटीव्ही लावावेत.
घरफोडी चोरी किंवा चोरीचा प्रयत्न इत्यादी प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आई

कोणत्याही टिप्पण्या नाहीत