अहमदनगर/वेबटीम:- उमेद सोशल फाउंडेशन यांच्या वतीने अहमदनगर येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी मान्यवरांच्या उपस्...
अहमदनगर/वेबटीम:-
उमेद सोशल फाउंडेशन यांच्या वतीने अहमदनगर येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणून नवनागापूर ग्रामपंचायत सदस्य बंडूनाना सप्रे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज हे बहुजन प्रतिपालक असून त्यांनी शिक्षणनाची ज्योत तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवली त्यांचे विचार आपण देखील आत्मसात करायला हवे.
प्रसंगी माजी सदस्य अशोक साळवे,उमेद फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, उपाध्यक्ष कुणाल तनपुरे, खजिनदार संजय निर्मळ,सल्लागार दीपक धिवर, प्रदीप बागुल, प्रकाश भालेराव,रवी सुरेकर, अरुण वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल तनपुरे यांनी केले तर आभार प्रदीप बागुल यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत