खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही 'साई आदर्श'ची बांधिलकी- शिवाजीराव कपाळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खेळाडूंना प्रोत्साहन देणे ही 'साई आदर्श'ची बांधिलकी- शिवाजीराव कपाळे

  राहुरी(वेबटीम) साई आदर्श मल्टीस्टेट च्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून नेहमीच खेळाडूंच्या मागे आम्ही उभे राहिलो आहोत देशाचे भविष्य असणाऱ...

 राहुरी(वेबटीम)



साई आदर्श मल्टीस्टेट च्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून नेहमीच खेळाडूंच्या मागे आम्ही उभे राहिलो आहोत देशाचे भविष्य असणाऱ्या खेळाडूंना शाब्बासकीची एक थाप दिली तर ते परिसराचा नावलौकिक जिल्हा राज्य देश पातळीवर पोहोचवतात म्हणूनच त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी केले आहे.




       याबाबत माहिती अशी की, साई आदर्श मल्टीस्टेट राहुरी या संस्थेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील शिवनेरी क्लब येथे खेळणाऱ्या खेळाडूंना हॉलीबॉल प्रदान करण्यात आले यावेळी कार्यक्रमास साई आदर्श मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, दत्तात्रेय कडू, किशोर थोरात, बाळासाहेब तांबे,चांगदेव पवळे, प्रशिक्षक राजेंद्र पुजारी आदींसह मान्यवर व खेळाडु उपस्थित होते.


      यावेळी सुरुवातीला प्रशिक्षक राजेंद्र पुजारी यांनी सर्वांचे स्वागत करत असताना सांगितले की, या शिवनेरी क्लबच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडू घडले आहेत. कारखाना सुरू होता त्यावेळी आर्थिक स्वरूपाची मदत मिळत असल्याने खेळाडूंना सर्व सुख सुविधा व क्रीडा साहित्य पुरवता  येत होते मात्र कारखान्याची परिस्थिती हालाखीची झाल्याने आता ते शक्य नाही. मात्र शिवाजीराव कपाळे यांनी पाहिजे तेव्हा आमच्या या खेळाडूंना मदत केलेली आहे. क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. आम्ही त्यांचे नेहमी ऋणी राहु.


      यावेळी बोलताना शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले. साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमी सामाजिक कार्याचा वसा हाती घेतलेला आहे अनेक रुग्णांना मदत, विद्यालयांना मदत, विद्यार्थ्यांना मदत, खेळाडूंना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. यामध्ये कधीही कोणताही भेदभाव ठेवलेला नाही. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आहे मात्र ती पुढे आणण्यासाठी त्यांना पाहिजे ते क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे. राजेंद्र पुजारी हे शिवनेरी क्लबच्या माध्यमातून या खेळाडूंना हॉलीबॉल चे प्रशिक्षण देतात अनेक खेळाडू त्यांनी देशपातळीवर नेले आहेत मात्र आता त्यांना या खेळाडूंसाठी मदतीची गरज आहे आमच्याकडून शक्य ती मदत आम्ही करून या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहोत या माध्यमातून हे खेळाडू आणखी पुढे जाऊन आपल्या परिसरातील नावलौकिक वाढवतील यात मला कोणती शंका नाही. यापुढेही आम्ही या खेळाडूंच्या मागे अशीच उभी राहू असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला.या वेळी राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल कु. विद्या शेळके हिचा शिवाजीराव कपाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत