श्रीरामपूर जिल्ह्यासाठी ग्राम सभेचे ठराव करण्याचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर जिल्ह्यासाठी ग्राम सभेचे ठराव करण्याचे आवाहन

श्रीरामपूर प्रतिनिधी  प्रभू श्री रामाचे नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा होण्याची मागणी ४२ वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबीत आहे. मात्र न...

श्रीरामपूर प्रतिनिधी



 प्रभू श्री रामाचे नावाने पावन झालेला श्रीरामपूर जिल्हा होण्याची मागणी ४२ वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबीत आहे. मात्र निकषाचा आधार न घेता शासनाने श्रीरामपूर ऐवजी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचा अधादेश काढला आहे. याला प्रामुख्याने श्रीरामपूर कोपरगांव राहुरी नेवासा तालुक्यातून तीव्र विरोध होत आहे.   यावर सर्व स्तरावर जनआंदोलने सुरु आहे. सद्यस्थितीत श्रीरामपूर जिल्हा मागणीला लोकशाही मार्गाने न्याय मिळण्यासाठी शेवटी कोर्टातहि कायदेशीर लढाई करावी लागेल. यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त ग्राम सभेचे ठराव करावेत. तसेच सर्व राजकिय पक्ष विविध सामाजिक संघटना 

गांव सोसायटी औदयोगिक संघटना वकिल संघटना वैद्यकीय संघटना पत्रकार संघटना शैक्षणिक संघटना बांधकाम व्यावसायिक संघटना पतसंस्था मल्टीस्टेट सर्व व्यापारी संघटना/असोसिएशन सर्व धर्मीय उत्सव मंडळ कामगार संघटना सर्व पेन्शनर्स संघटना बचत गट प्रवासी संघटना जेष्ठ नागरिक संघटना प्रतिनींधिंनी ठराव किंवा पाठींबा पत्र द्यावे. आणि सर्व नागरिकांनीहि स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन घ्यावा असे आवाहन श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती बैठकीत संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात राजेंद्र लांडगे म्हणाले कि, समितीने शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष आणि कायदे तज्ञ अजित काळे यांची भेट घेऊन कायदेशीर सल्लाही घेतला आहे. आमदार लहू कानडे यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी पुन्हा तारांकित प्रश्न उपस्थित करावा. त्या आधारे शासनाची भुमिका समोर येईल. त्यानंतर कोर्टात कायदेशीर मार्गाने न्याय मिळवता येईल अशी ग्वाही दिली. यासाठी मात्र जास्तीत जास्त ग्राम सभेचे आणि विविध सामाजिक संघटनेचे ठराव आवश्यक राहतील असाहि मौलिक  सल्ला कायदे तज्ञ अजित काळे यांनी दिला. यावेळी माजी आ.भाऊसाहेब कांबळे, शेतकरी संघटना वतीने जिल्हाध्यक्ष अनिल औताडे युवराज जगताप इंद्रभान चोरमल सुदाम औताडे प्रभाकर कांबळे शरद आसने शरद पवार यांनी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीला जाहिर पाठिंबा व्यक्त केला.

तसेच श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर सहाव्या दिवशी सुरु असलेल्या शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरज आगे यांनी सुरु केलेल्या बेमुदत आंदोलनाला श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती वतीचे बैठकीत जाहिर पाठिंबा व्यक्त केला आहे.

तसेच शिर्डी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे क्षेत्र आहे. तेथे राज्यासह देश-विदेशातून भक्तगण गर्दी करतात. वर्षभर सण उत्सव चालूच असतात. त्यातच वारंवार राज्य आणि केंद्रीय मंत्रीमंडळ सदस्यांची नेहमीच वर्दळ असते.यामुळे प्रशासनाची नेहमीच धांदल उडते. त्यातच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत झाल्यास सर्वसामान्य जनतेकडं लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ मिळणार नाही.

शासनाने श्रीरामपूर जिल्हा न केल्यास शहरासह तालुक्याची अर्थ व्यवस्था पूर्णतः मोडकळीस येईल. नव्याने कोणताच विकास होणार नाही. उद्योग धंदे अक्षरशः अडचणीत येतील. पर्यायाने बाजारपेठ उध्वस्त होईल. आणखीन विदारक स्थिती निर्माण होईल. प्रामुख्याने श्रीरामपूरसह नेवासा राहुरी तालुक्यातील युवापिढी देशोधडीला लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. यासाठी नव्याने नवनवीन उद्योजक औदयोगिक वसाहतीत येण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. श्रीरामपूर जिल्हा झाल्यास सर्वसामान्य जनतेची प्रगती होऊन सामान्य माणसांची क्रयशक्ती वाढेल. केंद्र आणि राज्याच्या अनेक कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेसाठी प्रशासनाला सहजतेने राबविता येतील.अनेक नवीन नवीन उद्योग धंदेसह महसुली उत्पन्नाचे श्रोत देखील निर्माण होतील. लोकसहभागातुन श्रीरामपूर जिल्हा चळवळ यशस्वी होण्यासाठी जिल्हाभर संघर्ष अभियान राबविणार असलेची राजेंद्र लांडगेनी शेवटी म्हटले आहे.

श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीने ग्राम सभेचे आणि विविध संघटनेचे ठराव मोहिम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष सुभाष जंगले अनंत निकम करण नवले चंद्रकांत परदेशी देविदास चव्हाण नागेश सावंत अशोक बागुल अभिजित बोर्डे मनोज हासे राजेंद्र गोरे विजय नगरकर सचिन बडधे अशोक थोरे किशोर फाजगे रामपाल पांडे रवि गरेला अशोक लोंढे तिलक डुंगरवाल कुणाल करंडे लकी सेठी दिपक पुरी नानासाहेब तुपे हभप दत्तात्रय बहिरट किशोर झिंजाड सुनील शेळके अनिल सावंत संदीप पवार आदीं परिश्रम घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत