देवळाली प्रवरा(वेबटीम) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण विभाग श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरासह 32 गावे प्रमुख प...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण विभाग श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरासह 32 गावे प्रमुख पदी विजय कुमावत तर देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी सतीश डोळस यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण विभाग कार्य कारिणी जिल्हा अध्यक्ष अशोक थोरे, विभागीय अध्यक्ष दत्ता पाटील कडु यांचे मार्गदर्शनाखाली तर श्रीरामपूर तालुका प्रमुख शेळके ,राहूरी तालुका अध्यक्ष कृष्णाभाउ पोपळघट यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये श्रीरामपुर मतदारसंघास जोडलेल्या ३२ गावाचे प्रमुख विजय कुमावत तर देवळाली प्रवराचे शहर अध्यक्ष पदी सतीष डोळस यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शहर अध्यक्ष अनिल चव्हाण, युवासेना शहर अध्यक्ष मनिष देठे , गिताराम बर्डे, संभाजी साळवे, अविनाश माळी, मंगेश बर्डे यांनी स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत