राहुरी(वेबटीम) बहुजन ग्रामविकास सेवा (असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय समाज भुषण- २०२३ पुरस्कारासाठी राहु...
राहुरी(वेबटीम)
बहुजन ग्रामविकास सेवा (असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय समाज भुषण- २०२३ पुरस्कारासाठी राहुरी येथील लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे धनंजय पानसंबळ यांची निवड करण्यात आली. त्या बाबत धनंजय पानसंबळ यांना पत्र देऊन पुरस्कारासाठी हजर राहण्यास सांगीतले.
बहुजन ग्रामविकास सेवा (असो.) संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संघटने मार्फत "राष्ट्रीय समाज भुषण २०२३ साठी धनंजय पानसंबळ यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे सोमवार दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२ वा. मा. मंत्री महोदय यांच्या हस्ते मधुकर घाडगे यांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडवर सर्व सुविधांनी युक्त असलेल्या लाइफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून धनंजय पानसंबळ यांनी राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोफत सर्वरोग निदान शिबिरांचे आयोजन करून विविध योजनांच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊन आधार देण्याचे कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
राहुरी तालूक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पानसंबळ यांचे अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत