राहुरी (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या वतीने देवळाली प्रवरा येथील शांताबाई सांस्कृतिक भवन येथे प्रकाशजी आंबेडकर यांच...
राहुरी (प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या वतीने देवळाली प्रवरा येथील शांताबाई सांस्कृतिक भवन येथे प्रकाशजी आंबेडकर यांच्या उपस्थितीत आदिवासी भिल्ल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या आदिवासी भिल्ल समाजाच्या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे दिनांक १८ जुलै २०२३ रोजी देवळाली प्रवरा येथे येत आहेत. महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमातीमध्ये सुमारे ४७ जमाती आहेत. या सर्व जमातींमध्ये आदिवासी भिल्ल जमातीची संख्या जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा समाज ज्या राजकीय पक्षांकडे झुकलेला असेल त्याच राजकीय पक्षाची सत्ता महाराष्ट्रामध्ये आलेली दिसते. परंतु या समाजाचा सर्व राजकीय पक्षांनी फक्त मतदानापुरता वापर केला आहे व मतदान झाल्यानंतर ते त्यांच्या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष करतात. आणि यामुळे त्यांची दिवसें दिवस आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थिती ढासळत चाललेली आहे. त्यांची ही परिस्थिती प्रस्थापित राजकीय पक्ष जाणून बुजून जैसे थे ठेवीत आहे.
कारण हे जर सुधारले तर आपल्या साखर कारखान्यावर लेबर कोण येईल? आपल्या शेतात मजूर भेटणार नाहीत. आपल्या वीट भट्टीवर मजूर भेटणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे आपल्याला जे तुटपुंजा पैशाने मतदान विकत घेता येते ते घेता येणार नाही. या त्यांच्या स्वार्थी फायद्यामुळे या राजकीय पक्षातील पुढारी विशेषता आदिवासी समाजाला मोठे होऊ देत नाही. हा आज पर्यंतचा इतिहास आहे. म्हणून आदिवासी समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक परिस्थिती सुधारायची असेल तर आदिवासी समाजाला त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याच जातीचे पुढारी सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार होणे आवश्यक आहे. आणि त्यातही त्यांना आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्रता देणाऱ्या आणि आदिवासी क्रांतीकारक असलेल्या राघोजी भांगरे, तंट्या मामा भिल्ल व बिरसा मुंडा, शाहू, फुले, आंबेडकरांची प्रामाणिक विचारधारा असणाऱ्या राजकीय पक्षाची गरज आहे. कारण इतिहासामध्ये ज्यांनी आपल्या राजांना कपट नीतीने मारून त्यांचे राज्य हस्तगत केले. आपल्या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांचा खोटा इतिहास लिहून त्यांना बदनाम केले. अशा विचारधारेचे राजकीय पक्ष आदिवासी च्या हिताचे असू शकत नाही. हे आदिवासी नेत्यांना व जनतेला ओळखता आल्याशिवाय आपली सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय परिस्थिती सुधरू शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे मुख्य प्रस्थापित पक्ष आहेत. यांचा आपण बारीक अभ्यास केला तर भारतीय संविधानाने आदिवासींना अनुसूचित पाच आणि सहा ही स्वतंत्र दिलेली आहे. परंतु ही अनुसूची काँग्रेस आणि भाजपने देखील लागू केलेली नाही. त्यामुळे हे प्रस्थापित पक्ष आदिवासींच्या हिताचे असूच शकत नाही. म्हणून सर्व आदिवासी, दलित, अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या आणि आदिवासी समाजाच्या हिताचा एकच नेता दिसतो आणि त्या नेत्याचे नाव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी. या नेत्यावर आता संपूर्ण महाराष्ट्रतील बहुजनांचा विश्वास असल्यामुळे आदिवासी भिल्ल समाजाला विनंती करेल की आपण आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत आला तर आपले अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार व खासदार या पक्षाच्या माध्यमातून निवडून जाऊ शकतात. व स्वतंत्रपणे आपण आपल्या समाजाचे कामे कोणताही अडथळा न येता करू शकतो. असा समाजाला ठाम विश्वास आहे. म्हणून माझ्या आदिवासी समाजाने वंचित बहुजन आघाडी सोबत यावे. यासाठी वंचित प्रणित एकलव्य आघाडीचे नेते अनिल जाधव व संजय बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यातील देवळाली येथील शांताबाई कदम मंगल कार्यालयात १८ जुलै २०२३ रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आदिवासी भिल्ल परिषद आयोजित केली आहे.
या परिषदेला सर्व दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, आबेडकरी विचार सरणीच्या कार्यकत्यांनी उपस्थित राहावे. असे आव्हान वंचित प्रणित एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष संजय बर्डे, एकलव्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी केले आहे.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत